अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांनी वेळीच स्वतःला सुधारावे : चित्रा वाघ यांचा पलटवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : “जशी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्योतिबा फुले यांनी रोवली तसचं, स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करण्याच्या नव्या परंपरेचा पायंडा दादांच्या हातून पाडला गेला. उगा पराचा कावळा करून,अर्थाचा अनर्थ करण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांनी वेळीच स्वतःला सावरुन लवकरच सुधारावे, ही विनंती!!!” असं लिहीत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Chitra Wagh News)
भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या पुणे भाजपच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा हा मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित कार्यक्रमाला गेल्या होत्या. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महिलाच नेहमी पुरूषांचं औक्षण करतात पण पुरूषांनी ही महिलांचं औक्षण करायला, त्यांच अभिष्टचिंतन करायला हवं म्हणत ५ बंधूना चित्रा वाघ यांच औक्षण करायला सांगितलं. या पुढे आपण हे केले पाहीजे हेही सांगितलं. यावेळी बोलत असताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “कदाचित राज्यातील ही पहिली घटना असावी. पुणे हे स्त्रीमुक्ती चळवळीचे केंद्र रा.िलेलं आहे तिथेच आज चंद्रकांतदादांनी या नवीन महिला सन्मानाच्या पायंड्याची सुरूवात केली आहे. त्यानंतर त्या म्हणाल्या की, “सावूमाईने आम्हाला शिक्षित सक्षम केले त्यामुळे सावित्री तर आता घरोघरी दिसत आहेच. पण स्त्रीशक्तीला नवीन आयाम/सन्मान देणारे चंद्रकांतदादा, हेमंत रासने सारख्या ज्योतीबांचा शोध जारी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही”
Chitra Wagh News :उगा पराचा कावळा
चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तूळातुन संमिश्र भावना व्यक्त केल्या जावू लागल्या. यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपल्या वक्तव्याच स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, “समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणारे हे महापुरुषांनाच आदर्श मानतात! काल पुण्यनगरीमध्ये हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला गेले असता केवळ स्त्रियांनीच पुरुषांचे औक्षण करायचं ही जुनी रूढी मोडत स्त्री सक्षमीकरणासाठी अग्रणी असणाऱ्या माझ्या भावांनी माझे औक्षण केले. जशी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्योतिबा फुले यांनी रोवली तसचं, स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करण्याच्या नव्या परंपरेचा पायंडा दादांच्या हातून पाडला गेला. उगा पराचा कावळा करून,अर्थाचा अनर्थ करण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांनी वेळीच स्वतःला सावरुन लवकरच सुधारावे,ही विनंती!!!
समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणारे हे महापुरुषांनाच आदर्श मानतात!
काल पुण्यनगरीमध्ये हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला गेले असता केवळ स्त्रियांनीच पुरुषांचे औक्षण करायचं ही जुनी रूढी मोडत स्त्री सक्षमीकरणासाठी अग्रणी असणाऱ्या माझ्या भावांनी माझे औक्षण केले१/२ https://t.co/Jgq9NcS6vR
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 30, 2023
जशी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्योतिबा फुले यांनी रोवली तसचं,स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करण्याच्या नव्या परंपरेचा पायंडा दादांच्या हातून पाडला गेला
उगा पराचा कावळा करून,अर्थाचा अनर्थ करण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांनी वेळीच स्वतःला सावरुन लवकरच सुधारावे,ही विनंती!!!
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 30, 2023
हेही वाचा
- ‘बीबीसी डॉक्युमेंट्री बंदी’ निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
- देशात होणारे धर्मांतरणाचे षडयंत्र हाणून पाडा : योगगुरु रामदेवबाबा
- Bharat Jodo Yatra : जम्मू-काश्मीरच्या जनतेने मला हँडग्रेनेड नव्हे, प्रेम दिले : राहुल गांधी
- पिंपरी : श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून भक्तगण येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे