सॅमसंगचा Galaxy Book2 Go 5G लॅपटॉप लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

Samsung Galaxy Book2 Go 5G
Samsung Galaxy Book2 Go 5G
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Samsung ने Galaxy Book2 Go 5G हा नवीन लॅपटॉप आज लाँच केला आहे. Galaxy Book Go सीरीज मधील हा नवीन लॅपटॉप आहे. यामध्ये 14 इंचाच्या फुल एचडी आयपीएस डिस्प्लेसह eSIM+ pSIM कनेक्टिव्हिटी देखील आहे.

Samsung Galaxy Book2 Go 5G किंमत

सॅमसंग गॅलॅक्सी Book2 Go 5G आज ब्रिटनमध्ये लॉन्च झाला आहे आणि जानेवारीच्या अखेरीस विक्रीसाठी हा उपलब्ध होणार आहे. 4GB RAM सह 128 GB स्टोरेज असलेल्या लॅपटॉपची किंमत सुमारे 64,900 रुपये इतकी आहे. 8 GB रॅम व 256 GB स्टोरेज लॅपटॉपची किंमत सुमारे 74,900 रुपये आहे. भारतीय बाजारात हा लॅपटॉप लवकरच लॉन्च होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Samsung Galaxy Book2 Go 5G चे फीचर्स

डिझाइनसाठी, लॅपटॉपमध्ये 14-इंच फुल एचडी स्क्रीन आहे आणि जवळजवळ 1.44 किलो वजनाची कॉम्पॅक्ट बॉडी आहे. यात 15.5mm पातळ फ्रेम आहे आणि 180-डिग्री फोल्डिंग वापरता येऊ शकतो. सॅमसंग गॅलॅक्सी Book2 Go 5G मध्ये 42.3 Wh बॅटरी आहे. हे मायक्रोसॉफ्ट विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टम बूट करते. यात Snapdragon 7c+ Gen 3 प्रोसेसर आहे. Snapdragon 7C+ Gen 3 हा 60 टक्के वेगवान CPU आहे. ग्राफिक्ससाठी Qualcomm Adreno GPU कार्ड आहे.  हा 70 टक्के अधिक वेगवान GPU आहे. लॅपटॉपला 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. एचडी वेबकॅम आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी, Wi-Fi 6E (802.11ax), ब्लूटूथ, 5G ENDC आणि USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे . यात नॅनो सिम स्लॉट आहे. Galaxy Book2 Go 5G मध्ये 42.3 Wh बॅटरी आहे. जी साडेतीन तास चालते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news