Australian Open 2023 : राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, | पुढारी

Australian Open 2023 : राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर,

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गतविजेता राफेन नदाल याला ऑस्‍ट्रेलियन ओपन  स्‍पर्धेत (  Australian Open 2023 ) आज पराभवाचा धक्‍का बसला. दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्‍या मॅकेन्झी मॅकडोनाल्डकडून नदालचा 6-4, 6-4, 7-5 असा पराभव झाला. मॅकेन्झी मॅकडोनाल्ड हा ६५ व्‍या स्‍थानी आहे. अव्वल मानांकित नदालविरुद्धचा विजय हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय ठरला आहे.

दुसर्‍या फेरीतील सामन्‍यात नदालला दुखापत झाली. त्‍यामुळे त्‍याची लय बिघडली. मॅकेन्झी मॅकडोनाल्ड याने याचा फायदा घेत सरळ तीन सेटमध्‍ये त्‍याचा पराभव करत तिसर्‍या फेरीत प्रवेश केला.

Australian Open 2023 : नदालच्‍या पत्‍नीला अश्रू अनावर

३६ वर्षीय नदाल याने दुखापतीशी झूंज देतच दुसर्‍या फेरीतील सामना खेळला. असह्‍य वेदना होत असल्‍याने त्‍याने
सामन्‍यावेळी थोडा वेळ विश्रांतीही घेतली. यानंतर पुन्‍हा सामना सुरु झाला मात्र लय बिघडलेल्‍या नदालच्‍या चुका हेरत मॅकेन्‍झी याने अचूक खेळी केली. या सामन्‍यात कमबॅक करण्‍यासाठी नदलाने केलेला संघर्ष पाहून त्‍याची पत्‍नी मारिया फ्रान्‍सिस्‍का पेरेलो हिला अश्रू अनावर झाले.

ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेच्‍या पहिल्‍या फेरीत नदालला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. या सामन्‍यातही त्‍याला दुखपतीमुळे तो त्रस्‍त होता. चार सेटमध्‍ये झालेला सामना जिंकत नदालने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button