Bharat Jodo Yatra: ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरमध्ये पोहोचण्यापूर्वी काँग्रेसला धक्का; प्रवक्त्याने दिला राजीनामा | पुढारी

Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रा' काश्मीरमध्ये पोहोचण्यापूर्वी काँग्रेसला धक्का; प्रवक्त्याने दिला राजीनामा

पुढारी ऑनलाईन: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची सध्या देशभरात जोरदार चर्चा होत आहे. आता काही दिवसात ही यात्रा जम्मू-काश्मीरच्या शेवटच्या दिशेने प्रवास करेल. दरम्यान, काँग्रेससाठी एक वाईट बातमी समोर येत आहे की, काँग्रेसच्या जम्मू-काश्मीर युनिटच्या प्रवक्त्या दीपिका पुष्कर नाथ यांनी राजीनामा दिला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होण्यासाठी माजी मंत्री लालसिंग यांना ‘परवानगी’ देण्याच्या पक्षाच्या हायकमांडच्या निर्णयाचा हवाला देत, दीपिका यांनी काँग्रेसच्या प्रवक्ता आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला. या आठवड्यात भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात प्रवेश करणार आहे.

याविषयी नाथ यांना विचारले असता, वैचारिक कारणास्तव पक्ष सोडत असल्याचे म्हटले आहे. २०१८ च्या कठुआ बलात्कार प्रकरणात आठ वर्षांच्या मुलीच्या बलात्कारकर्त्यांचा “निर्लज्जपणे बचाव” करून खटला चालवण्यास सिंह जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दोन वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार राहिलेल्या सिंह यांनी २०१४ मध्ये काँग्रेस सोडली आणि भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

जम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजपच्या मागील आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते. जानेवारी २०१८ मध्ये, सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत सहभागी झाले. यानंतर झालेल्या गदारोळानंतर त्यांनी डोगरा स्वाभिमान संघटना पक्ष (DSSP) ची स्थापना केली.” शांत होण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी” मी रॅलीत सहभागी झाल्याचे स्पष्टीकरण देत, त्यांनी स्वत:चा बचाव केल्याचेही राजीनामा दिलेल्या दीपिका पुष्कर नाथ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button