नागपूर: विधानसभेच्या कामकाजाकडे विरोधकांची पाठ; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय | पुढारी

नागपूर: विधानसभेच्या कामकाजाकडे विरोधकांची पाठ; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

पुढारी ऑनलाईन: नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. परंतु सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना व्यवस्थित वागणूक देत नाही. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे तरी, अद्याप सरकारने कर्नाटकविरोधात ठराव केला नाही? तसेच जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधी पक्षाचे नेते विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

आज होणाऱ्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नसल्याचे महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसच्या कार्यालयात मविआची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाला सहभागी न होता, पायऱ्यांवर बसण्याचा निर्णय विरोधकांकडून घेण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात येणार आहे

यावेळी अजित पवार यांनी जयंत पाटील यांनी सभागृहात जे म्हटले ते अयोग्यच होते. मात्र अशी विधाने यापूर्वीही झाली आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई अयोग्य आहे. या कारणांसाठी विरोधी पक्षातील सर्व नेते आज होणा-या कामकाजात सहभागी होणार नाही, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button