Weather : दिल्लीसह राज्‍यात धुक्‍याची चादर; ‘या’ राज्‍यात कमी तापमान, उच्च आर्द्रता राहणार | पुढारी

Weather : दिल्लीसह राज्‍यात धुक्‍याची चादर; 'या' राज्‍यात कमी तापमान, उच्च आर्द्रता राहणार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Weather : उत्तर भारताला अनेक ठिकाणी दाट पांढर्‍या धुक्याच्या चादरीने झाकलेले आहे. दिल्ली प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेने किमान तापमान ७.१ अंश सेल्सिअस नोंदवले. जे सामान्य तापमानापेक्षा एक अंश कमी आहे. कमाल तापमान २१.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान आहे. येत्या काही दिवसात किमान आणि कमाल तापमानात अनुक्रमे ५ अंश सेल्सिअस आणि २० अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

Weather : भारतीय हवामान विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, वायव्य राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडच्या या राज्‍यात काही भागांवर कमी तापमान, उच्च आर्द्रता आणि स्थिर वारे यांच्यात दाट धुके पुढील काही दिवस राहणार आहे. दिल्लीत या आठवड्याच्या सुरूवातीलाच सोमवारी हंगामातील पहिले दाट धुके पसरले होते. परंतु आठवडाभर उत्तर भारतातील इतर भागांच्या तुलनेत धुके सौम्य राहिले.

Weather : धुक्यामुळे काही भागात प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले होते. तर काही शहराच्या बहुतांश महानगरांमध्ये दुपारच्या आधी धुके साफ झाले. उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे काही भागात वाहनांचे अपघात झाले. दुसरीकडे, काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कडाक्याच्या थंडीचा काळ सुरू झाला. तर अनेक जलाशयांचे काठ गोठले आहेत.

Weather : लखनौ-गोरखपूर राष्ट्रीय महामार्गावर कमी दृश्यमानतेमुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने 11 जण जखमी झाले. भटिंडा येथे सकाळी 6 वाजता दृश्यमानता शून्य होती. गंगानगर, अमृतसर आणि बरेलीमध्ये 25 मीटर आणि वाराणसी, बहराइच आणि अंबालामध्ये 50 मीटर दृश्यता होती.

Weather : याउलट दिल्लीत धुक्‍याचे प्रमाण असल्‍याने विमानातळावरील कामकाज उशिरा सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री चंदीगड, वाराणसी आणि लखनऊमध्ये खराब हवामानामुळे तीन विमानाचे उड्डाणे दिल्ली विमानतळावरच थांबवण्यात आली आहे.

. हेही वाचा 

Omicron BF.7: अमेरिकेसह १० देशांत कोरोनाचा उद्रेक; ‘ओमायक्रॉन’च्या बीएफ.7 सबव्हेरियंटचा चीनमध्ये उच्छाद

दहावीच्या विद्यार्थांना मोठा दिलासा; आता होणार बारावी बोर्ड

Legislative Council : शाळांना सीसीटीव्ही सक्तीचे करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

Back to top button