

पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter : सोशल मीडिया हे एक प्रकारचे दुधारी अस्त्र आहे. याचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करता येतो. तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त नकारात्मक गोष्टींच्या प्रसारासाठी केला जातो. त्यामुळेच वेगवेगळ्या सोशल माध्यमांनी याला आळा घालण्यासाठी वेगवेगळी पावले उचलली आहेत. यात ट्विटरच्या एलॉन मस्क यांनी देखिल याच्यावर आता आपली नवीन पॉलिसी जाहीर केली आहे.
Twitter : एलॉन मस्क यांनी हेट स्पीचबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. ट्विटरच्या नव्या नीतिनुसार तुम्हाला अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र, ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही. याची दक्षता घेण्यात येणार आहे. म्हणजेच मोनिटायजेशच्यावेळी असे ट्विटर जास्तीत जास्त डीबुस्ट केले जाणार तसेच या ट्विटचे मॉनिटायझेशन करून कोणत्याही प्रकारची जाहिरात यावर मिळणार नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या ट्विटच्या माध्यमातून कोणताही पैसा उपलब्ध होणार नाही. तसेच जोपर्यंत इंटरनेटवर स्वतः असे ट्विट शोधणार नाही तोपर्यंत असे ट्विट पाहता येणार नाही. किंवा आढळणार नाही.
Twitter : कामाचे तास वाढवल्यामुळे अनेक कर्मचा-यांनी ट्विटरला रामराम ठोकला आहे. त्यापूर्वी ट्विटरने स्वतःच आपल्या निम्म्या कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे ट्विटरमध्ये सध्या कर्मचारी खूपच कमी आहेत. मात्र याबाबत एलॉन खूपच निश्चिंत आहे. त्याने म्हटले आहे, सर्वश्रेष्ठ लोक काम करत आहे. त्यामुळे मी खूप जास्त चिंतीत नाही. मात्र, कर्मचा-यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर कार्यालय सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
Twitter : तर ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करण्याबाबत एलन मस्कने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. एवढेच म्हटले आहे.
हे ही वाचा :