लग्नानंतर राणादा - पाठकबाई पोहोचले नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून पाठकबाई आणि राणादा यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील राणादा म्हणजे, अभिनेता हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजे, अक्षया देवधर यांनी उत्तमरित्या भूमिका साकरल्या आहेत. मालिकेतील ही रोमॅन्टिक जोडी खऱ्या आयुष्यातही नुकतेच विवाह बंधनात अडकली. यानंतर हार्दिक- अक्षया नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर पोहोचले आहेत. ( राणादा – पाठकबाई )
अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी याचे २ डिसेंबरला रोजी मोठ्या थाटामाटाने लग्न सोहळा संपन्न झाला. या लग्नात दोघांचे खास नातेवाईक आणि मित्र परिवाराने उपस्थिती लावली होती. लग्नानंतर हे कपल सध्या नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तश्रृंगी गडावर गेले आहेत. यावेळचे काही फोटो अक्षयाच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात अक्षयाने ब्ल्यू- गुलाबी कलरच्या सहावारी साडीत तर हार्दिकने येलो रंगाची शेरवानी आणि व्हाईट रंगाचा पायजमा परिधान केला आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘#अहा ❤️🙏🏻✨ #Blessed’. असे लिहिले आहे. यावेळी अक्षयाच्या चेहऱ्यावर लग्नानंतरचा ग्लो प्रखरपणे दिसत होता. या क्यूट कपलच्या मागे सप्तश्रृंगी देवीची प्रतिमा खूपच आकर्षक दिसत आहे. दोघांच्या कपाळावर हळद- कुकूंवाचा टिळकदेखील दिसत आहे. लग्नानंतर वैवाहिक जीवनास सुरूवात करण्यासाठी या कपलने देवीच्या दर्शन घेतले आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देत ‘नाशिकला येवून गेलात आम्हाला भेटला नाहीत’ असे म्हटलं आहे. याच दरम्यान एका युजर्सने ‘अहा……😍❤️’, ‘Beautiful jodi❤️❤️’, ‘Woow sundar’, ‘वाह जोडा अगदी छान शोभतोय हो 🙌😍❤️’, ‘आई सप्तश्रृंगी देवी’, ‘❤️nice couple, Khupach chhan 😍❤️’, ‘Lovely couple❤️😘🥰’, ‘वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा….’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘फेवरेट जोड़ी❤️🌍’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. या फोटोला ५ तासात जवळपास अभिनेत्री सायली संजीवसह १ लाखाहून अधिज जणांनी लाईक्स केले आहे. ( राणादा – पाठकबाई )
हेही वाचा :
- Aamir Khan : एक्स वाईफ किरण रावसोबत आमिरने केली कलश पूजा (photos)
- भाग्य दिले तू मला : राज- कावेरीच्या सुंदर नात्याची सुरुवात होणार?
- EctoLife : भविष्यात मुलं कृत्रिम गर्भातून जन्मणार! जगातील पहिल्या कृत्रिम गर्भ सुविधेसाठी संकल्पनेचे अनावरण
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram