पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त अरब अमिरातील एका चार वर्षीय मुलाने पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तक प्रकाशित करणारा तो सर्वात कमी वयाचा मुलगा ठरला आहे. त्याने हे पुस्तक प्रकाशित करत वय हा यशाचा अडथळा नसतो हे सिद्ध केले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, ४ वर्षे आणि २१८ दिवस वयाचा, अबू धाबीचा छोटा सईद रशीद अल-म्हेरी हे पुस्तक प्रकाशित करणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती आहे.
"द एलिफंट सईद आणि अस्वल" या पुस्तकाच्या १,००० प्रती विकल्यानंतर ९ मार्च २०२३ रोजी त्याच्या रेकॉर्डची पडताळणी करण्यात आली. या पुस्तकामध्ये दयाळूपणा आणि दोन प्राण्यांमधील अनपेक्षित मैत्रीची कथा सांगितलेली आहे." सईदला त्याची मोठी बहीण, अल्धाबी, हिने त्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली.
खलीज टाईम्सच्या मते, त्यांची सर्वात मोठी मार्गदर्शक त्यांची ८ वर्षांची मोठी बहीण, अलधाबी आहे. जिने द्विभाषिक पुस्तकांची मालिका (स्त्री) प्रकाशित करणारी सर्वात लहाण व्यक्ती म्हणून विक्रम केला आहे. याआधी, द्विभाषिक पुस्तक (महिला) प्रकाशित करणारी सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा विक्रमही तिने केला.