PBKSvsKKR : पंजाब ७ धावांनी विजयी; डकवर्थ-लुईस नियमाने केकेआर पराभूत | पुढारी

PBKSvsKKR : पंजाब ७ धावांनी विजयी; डकवर्थ-लुईस नियमाने केकेआर पराभूत

मोहाली; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये पंजाब किंग्जने शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 5 बाद 191 धावा केल्या. कोलकाताच्या गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांत चांगली कामगिरी करून दाखवली अन् पंजाबच्या धावांना ब्रेक लावला. पंजाबने मोक्याच्या क्षणी विकेट टाकल्याने त्यांना अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. (PBKSvsKKR)

भानुका राजपक्षाचे अर्धशतक अन् शिखर धवनची संयमी खेळी वगळल्यास पंजाबचे अन्य फलंदाज फार कमाल दाखवू शकले नाहीत. पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने 16 षटकांत 7 बाद 147 धावा केल्या असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला. आणि पुढे खेळ न झाल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबला 7 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. (PBKSvsKKR)

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंगने 12 चेंडूंत 23 धावा करताना आक्रमक सुरुवात करून दिली. टीम साऊदीच्या षटकात त्याने 2 चौकार व 1 षटकार खेचला; परंतु किवी गोलंदाजाने चतुराईने विकेट घेतली. भानुका राजपक्षाने केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई करताना 32 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या आणि धवनसोबत त्याने 55 चेंडूंत 86 धावांची भागीदारी केली. उमेश यादवने त्याची विकेट घेतली. जितेश शर्माने झटपट धावांचा सपाटा लावला आणि 11 चेंडूंत 21 धावा चोपल्या. जितेश शर्माने झटपट धावांचा सपाटा लावला आणि 11 चेंडूंत 21 धावा चोपल्या.

अनुभवी गोलंदाज टीम साऊदीने त्याला चतुराईने बाद केले. पदार्पणवीर सिकंदर रझाने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. टी-20 वर्ल्डकप रझाने गाजवले होते आणि त्यामुळेच त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. संयमी खेळ करणार्‍या धवनला (40) वरुण चक्रवर्थीने त्रिफळाचीत केले. धवनच्या विकेटनंतर आयपीएलमधील महागडा खेळाडू सॅम करन मैदानावर आला. करन व रझा ही जोडी पंजाबला दोनशेपार नेईल असे वाटत असताना सुनील नरीनने मोक्याच्या क्षणी झटका दिला.

रझा 16 धावांवर झेलबाद झाला. शाहरूखने अखेरच्या षटकांत काही सुरेख फटके मारताना पंजाबला मोठा टप्पा गाठून दिला. करननेही धावांत भर घातली. पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 बाद 191 धावा केल्या. शार्दूलने 4 षटकांत 43 धावा दिल्या. टीम साऊदीने दोन विकेटस् घेतल्या; परंतु त्याच्या 4 षटकांत 54 धावा दिल्या. करन 17 चेंडूंत 26 धावांवर, शाहरूख 11 धावांवर नाबाद राहिला. स्टेडियमवरील लाईटस् बंद पडल्यामुळे दुसरा डाव थोडा उशिरा सुरू झाला. खेळाडूंना मैदानावर येऊन पुन्हा माघारी जावे लागले.

हेही वाचा;

Back to top button