Amit Kshatriya : कोण आहेत भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय, ज्यांना NASA ने बनवले 'मून टू मार्स' प्रोग्रॅमचे प्रमुख | पुढारी

Amit Kshatriya : कोण आहेत भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय, ज्यांना NASA ने बनवले 'मून टू मार्स' प्रोग्रॅमचे प्रमुख

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) नवीन प्रोग्रॅम सुरु केला आहे आहे. मून टू मार्स असे या नव्या प्रोग्रॅमचे नाव आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहावर होणारे मानवी उपक्रम आणि डिझायनिंग याविषयीच्या नियोजनासाठी हा प्रोग्रॅम असणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने या नव्या प्रोग्रॅमचे हेड म्हणून भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड केली आहे. अमित क्षत्रिय (Amit Kshatriya) असे त्यांचे नाव आहे.

अमित हे नासाच्या असोसिएट्स ॲडमिनिस्ट्रेटर यांच्याअंतर्गत काम करणार आहेत. नासा प्रमुख आणि ॲडमिनिस्ट्रेटर बिल नेल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मून टू मार्स हा प्रोग्रॅम चंद्रावर होणाऱ्या मोहिमा आणि मंगळावर मानवाला पाठवण्याच्या उपक्रमावर काम करणार आहे. ही वेळ अंतराळात संशोधन करण्याकरिता सुवर्णयुग आहे. अमित क्षत्रिय यांच्यावर नासाने ही जबाबदारी दिली आहे. या नव्या जबाबदारीमुळे चंद्रावरील मानवाच्या दीर्घकालीन रहिवासासह, मंगळावर मानवाला पाठविण्याचे स्वप्नही पूर्ण करण्याचे अवघड शिवधनुष्य क्षत्रिय यांच्या खांद्यावर अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने सोपवले आहे.

कोण आहेत अमित क्षत्रिय

चंद्र आणि मंगळ ग्रहावरील मानवी मोहिमांची तयारी करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे याची जबाबदारी आता अमित क्षत्रिय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. क्षत्रिय यांनी एकीकृत अंतरिक्ष प्रक्षेपण प्रणाली ‘ओरियन’ आणि एक्स्प्लोरेशन ग्राऊंड सिस्टम प्रोग्रॅमचे संचलन आणि नेतृत्व केले आहे. सामान्य अन्वेषण प्रणाली विकासचे कार्यवाहक सहाय्यक संचालक म्हणूनही क्षत्रिय यांनी काम केले आहे.

क्षत्रिय यांचे अंतराळ मिशनमध्ये करिअर

अमित क्षत्रिय (Amit Kshatriya) यांनी साल 2003 मध्ये अंतराळ मिशनमध्ये करियरची सुरूवात केली होती. साल 2014 पासून ते 2017 पर्यंत अंतरिक्ष केंद्र उड्डाण संचालक पदावर ते होते. क्षत्रिय याचे कुटुंबीय भारतातून अमेरिकत स्थायिक झाले आहेत. त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून गणित आणि विज्ञान विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. आणि त्यानंतर टेक्सास युनिव्हर्सिटीतून गणितात एमएची पदवी घेतली आहे.

हेही वाचा

Back to top button