पुणे: दोन चोरट्यांसह आठ मोटारसायकल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची धडाकेबाज कारवाई | पुढारी

पुणे: दोन चोरट्यांसह आठ मोटारसायकल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची धडाकेबाज कारवाई

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोघांना जेरबंद करून २ लाख ४३ हजार रूपये किंमतीच्या एकुण ८ मोटार सायकल हस्तगत केल्या. ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेकडून मागील महिनाभरात मोटार सायकल चोरीबाबत करण्यात आलेली हि तिसरी मोठी कारवाई करण्यात आहे. आतापर्यंत एकुण १५ लाख ९३ हजार रुपये किंमतीच्या एकुण ४७ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

संदिप पोपट केदार (वय २१) व राजु गंगाराम दुधवडे (वय २०, दोघेही रा. चिखलठाण, राजबेट, ता. राहुरी, जि. अहमदनगर) असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

शनिवार १ एप्रिल रोजी जुन्नर विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दीपक साबळे, पोलिस नाईक संदिप वारे, पोलिस जवान अक्षय नवले, दगडु विरकर या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वरील संशयित यांना आणेघाट परीसरातून ताब्यात घेऊन कारवाई केली. यावेळी पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्ह्यातील मोटार सायकलचे चार गुन्हे उघडकिस आले असुन २ लाख ४३ हजार रूपये किंमतीच्या एकुण आठ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी मार्गदर्शन केले.

Back to top button