गडचिरोलीच्या जंगलात चकमक; ४ माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीच्या जंगलात चकमक; ४ माओवाद्यांचा खात्मा

पुढारी ऑनलाईन डेस्क : डचिरोलीच्या कोलामार्का जंगलात सी ६० जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ४ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कोलामार्का पर्वताजवळ सी ६० आणि सीआरपीएफ (CRPF) क्यूएटी (QAT) च्या पथकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चार नक्षलवाद्यांना ठार केले. एक एके ४७, एक कार्बाइन, २ देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामानही जप्त करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले ३६ लाखांचे रोख बक्षीस होते. परिसरात पुढील शोध आणि नक्षलविरोधी कारवाया सुरू असल्याचे गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news