पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ४ लाखांची रोकड जप्त; कोगनोळी तपासणी नाक्यावर कारवाई | पुढारी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ४ लाखांची रोकड जप्त; कोगनोळी तपासणी नाक्यावर कारवाई

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज (दि. १८)  ४ लाखांची रोकड निवडणूक विभागाने जप्त केली. कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्यानंतर निपाणी ग्रामीण पोलीस व निवडणूक प्रशासनाने केलेली ही कारवाई आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोगनोळी टोलनाका येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाका स्थापित करण्यात आला आहे. त्यानुसार कागल येथील रहिवाशी महेश गाडेकर हे आपल्या कारमधून सीमा तपासणी नाका पार करून नजीकच असणाऱ्या कर्नाटक पेट्रोल पंपाकडे जात होते.यावेळी तपासणी नाक्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारची तपासणी केली असता गाडेकर यांच्याकडे विना कागदपत्राविना 2 लाख 56 हजार 770 रुपये आढळून आले.

याबाबत गाडेकर यांच्याकडे रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत दरम्यान त्यानंतर लागलीच या ठिकाणी कोल्हापूरहून केंचेवाडी (ता. चंदगड) येथे दशरथ कुट्रे हे कारमधून जात होते. तपास नाक्यावर त्याचे वाहन आले असता वाहनाची तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी केली असता कारमध्ये विना कागदपत्राविना 1लाख 40 हजार रुपये आढळून आले.याबाबत कुट्रे तसेच गाडेकर यांच्याकडून रकमेबाबतबाबत कोणतीही कागदपत्रे देता न आल्याने सीमातपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त करून निवडणूक विभागाकडे रात्री सादर केली.या कारवाईत सीपीआय बी.एस.तळवार व ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी यांनी सहभाग घेतला.

Back to top button