Urfi Javed: उर्फी जावेदचे चेतन भगत यांना उत्तर, "खापर स्त्रियांवर फोडून तुम्हीच..." | पुढारी

Urfi Javed: उर्फी जावेदचे चेतन भगत यांना उत्तर, "खापर स्त्रियांवर फोडून तुम्हीच..."

पुढारी ऑनलाईन: सोशल मीडियावर आपल्या कपड्यांच्या फॅशनसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका वृत्तवाहिनीद्वारा आयोजित कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना चेतन भगत यांनी  उर्फीच्या कपड्यांबाबत वक्तव्य केले होते. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर कॉमेंट केली होती. आता स्वत: अभिनेत्री उर्फी जावेद हिनेच चेतन भगत यांनी तिच्यावर केलेल्या वक्तव्यावर बेधडक आणि सडेतोड उत्तर दिल्याने चेतन भगत अडचणीत आले आहेत.

Urfi3

चेतन भगत यांनी तिच्यावर केलेल्या वक्तव्यावर उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून भगत यांना चांगलेच फटकारले आहे. तिने म्हटले आहे की, बलात्कारी संकृतीला प्रोत्साहन देणे बंद करा, तुम्ही आजारी डोकी असलेले लोक आहात. मिस्टर चेतन, पुरूषांच्या वागणुकीसाठी महिलांना जबाबदार धरणे ही ८० व्या शतकातील गोष्ट आहे. स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींना तुम्ही मेसेज करत होता, तेव्हा तुम्हाला कोण भरकटवत होते? असा प्रश्नदेखील उर्फीने भगत यांना केला आहे.

Urfi4

काय म्हटले होते चेतन भगत?

एका वृत्तवाहिनीव्‍दारे आयोजित कार्यक्रमात बोलताना चेतन भगत म्‍हणाले की, ” आजकालचे तरुण हे अंथरूणात जावून उर्फी जावेदचे (Urfi Javed) फोटो पाहतात आणि ते लाईक करतात. इंटरव्हयूला गेल्‍यावर  मला उर्फीची साडी आणि ड्रेस माहित आहे, असे सांगणार का?. आजकालचा युवक हा सोशल मीडियावर उर्फी जावेदचे (Urfi Javed)  फोटोला लाईक करत बसला आहे. पण यामध्ये उर्फीची काही चूक नाही. ती तर तिचे करियर बनवत आहे.”

चुकांचे खापर स्त्रियांवर फोडून तुम्हीच तरुणांना बिघडवत आहात

स्वत:च्या चुका बघू नका, नेहमी दुसऱ्या स्त्रियांनाच दोषी ठरवत राहा. मी नाही तर तुमच्या सारखेच लोक तरुणांना बिघडवत आहेत. तुमच्या सारखेच लोक आजच्या मुलांना शिकवत आहेत की, आपल्या चुकांचे खापर हा स्त्रियांवर आणि त्यांच्या कपड्यांवर कसे फोडायचे, असे उत्तर उर्फी जावेदने दिले.  चेतन भगतच्या चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो उर्फीसोबत बोलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

हेही वाचा:

Back to top button