Tips For Parents: पालकांनो, थंडीत मुले आजारी पडल्यास औषध देताना ‘ही’ काळजी घ्या

Tips For Parents: पालकांनो, थंडीत मुले आजारी पडल्यास औषध देताना ‘ही’ काळजी घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क: बदलत्या वातावरणाचा सगळ्यात पहिल्यांदा परिणाम हा लहान मुलांच्या आरोग्यावर होतो. लहानांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना सर्दी, खोकला, ताप अशाप्रकारचा जंतुसंसर्ग लवकर होतो आणि त्याचा त्यांना त्रास देखील होतो. मुले अचानक आजारी पडल्यास अधिकतर पालक हे मुलांना घरात उपलब्ध असणारीच औषधे देतात. पण अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे असते. चला तर जाणून घेऊया मुलांना औषध देण्यापूर्वी  किंवा देतांना पालकांनी (Tips For Parents) काय काळजी घ्यावी.

Tips For Parents: मुलांना औषधे देताना 'ही' घ्या काळजी

थंडीच्या दिवसात मुलांचे अचानक नाक गळू लागले, घसा दुखतो, खोकला होतो किंवा काहीवेळा त्यांना अचानक ताप भरतो. अशाप्रकारे मुले अचानक आजारी पडल्यास घरातील औषध वापरताना पालकांनी (Tips For Parents) त्यावरील एक्सपायरी डेट (औषधाची शेवटची मुदत) बघणे गरजेचे आहे.

मुलांना घरात उपलब्ध असणारी औषधे देण्यापूर्वी औषधाच्या बाटलीवर लिहलेल्या सूचना वाचाव्या आणि त्याचा काळजीपूर्वक अवलंब करा. औषधांवरील सूचना या शक्यतो हे इंग्रजी आणि वैद्यकीय भाषेत असतात. त्यामुळे ते सहज समजत नाही. अशावेळी मेडिकल दुकानदाराला किंवा डॉक्टरला विचारूनच ते मुलांना द्या.

मुलांना त्यांच्या वयानुसार जे योग्य आहे तिच औषधे द्या. आपल्या मुलांच्या आजारावर उपयोगी असणारीच औषधे द्या. तुमचे मुल लवकर बरे व्हावे, यासाठी ज्यादा औषधे देऊ नका. हे सर्व करताना तुमच्या लहान मुलांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मुलांना औषध देताना औषधासोबत असलेल्या मापाचाच उपयोग करा. याऐवजी तुम्ही घरातील चमचाचा देखील उपयोग करू शकता. मुलांना औषध देऊन झाल्यानंतर हे औषधावरील माप आणि चमचा स्वच्छ गरम पाण्याने धुवून, पुसून ठेवा.

मुले आजारी पडल्यास मुलांना एकाच आजारावर अनेक प्रकारची वेगवेगळी औषधे देऊ नये. औषधे देताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. हे पालकांनी लक्षात घ्यावे.

थंडीत संसर्गापासून बचावासाठी हे देखील करा

मुलांना त्यांचे हात साबणाने भरपूर पाण्याचा वापर करून स्वच्छ धुवायला सांगावेत, जेणेकरून या दिवसात होणाऱ्या जंतुसंसर्गाचा धोका कमी होईल.

शिंकताना किंवा खोकताना तोंड किंवा नाक झाकण्यासाठी रूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा.

तुमच्या मुलाला तापचा संसर्ग झाला असेल तर, त्याच्यावर घरीच उपचार करा. तुमच्या मुलाला लोकांच्या संपर्कात पाठवू नका, जेणेकरून संक्रमण पसरणार नाही.

मुलांचा ताप कमी झाल्यानंतर त्याला कमीत कमी २४ तास घरातच राहू द्या.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news