Rupali Bhosale : मनमोहिनी तू अप्सरा सुंदरा; रूपालीचे नऊवारीत नखरेल अदा | पुढारी

Rupali Bhosale : मनमोहिनी तू अप्सरा सुंदरा; रूपालीचे नऊवारीत नखरेल अदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते!’ ही मालिका चाहत्याच्या घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेत अरूधंती, अनिरूद्ध, संजना, आप्पा, कांचनबाई, गैरी, यश, ईशा या सर्व कलाकारांनी जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. यातील इतर कलाकारांसोबत अरूधंती, अनिरूद्ध, संजना या तिघांच्या भूमिकेने चाहत्यांचे खूपच मनोरंजक केलंय. या मालिकेत दररोज नवीन संकटे देशमुख कुटुंबीयावर येतात आणि त्यातून अनेक वेळा बाहेर पडण्यास सून म्हणून अरूधंतीचा कस लागतो. यातून सर्व संकटावर मात करून देशमुख कुटुंबीयांना त्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अरूधंती दिसते. मलिकेतील गाजलेलं एक पात्र म्हणजे, संजना होय. संजनाची भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosale ) हिने प्रभावीपणे पेलली असून तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असते. याच दरम्यान रूपालीचा आणखी एक नवा लूक समोर आला आहे.

अभिनेत्री रूपाली भोसलेने ( Rupali Bhosale ) तिच्या इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूकमधील फोटोज शेअर केले आहेत. यात ती अंबा कलरच्या नऊवारी साडीसोबत जांभळ्या रंगाचे लांब शोल्डर ब्लॉऊज परिधान केलं आहे. नाकात नथ, केसांत गजरा, हातात सोनेरी बांगड्या, गळ्यात मोत्याचा नेकलेस. कानात मोत्याचे झुमके, हातात अंगठी, कपाळावर चंद्रकोर, लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. रूपालीवर हा लूक खूपच मनमोहक आणि खुलून दिसतोय. या फोटोला तिने किलर पोझ दिली आहे.

या फोटोला तिने ‘Wear Gratitude like a cloak and it will feel every corner of your life….’ असे लिहिले आहे. रूपालीच्या पाठीमागे एक लोखंडी गेटचा दरवाजा दिसतोय. कधी केसांत हात घालून तर कधी स्वत:च्याच हातात -हात ठेवून रूपालीने फोटोला पोझ दिली आहे. यातील प्रत्येक फोटोत रूपालीची अदा, नजाकत, हास्याने तिचे सौदर्यं खुललं आहे. हे फोटो चाहत्यांच्या पंसतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने ‘Hayeee 😍 😍’, ‘खरच खूप छान ❤️❤️’, ‘Nice photos 🦋🦋’, ‘Awesome’,’ Awww❤️❤️’,’ Kdk मामी 🔥’, ‘Waw Beautiful 😍😍’, ‘🙌🙌🙌 forever gorgeous’, ‘Super 🔥’, ‘Wowww 😲 🔥’, ‘Layyyy bhariiiiiiiiiiiii♥️🔥’, ‘Love you yaar sweetheart’beautiful darling❤️❤️’, ‘Sundari❤️’, ‘Awesome look 😍😍’, ‘Apratim❤️’, ‘मन मोहिनी 🧡😍😍😍❤’, ‘👌👌 आ नं द दा यी ! 👌👌’, ‘Wow’, ‘Nice ❤️’, ‘कोणत्या राज्याची तू ग राणी, गगगगगगग…..❤️’, ‘😍 gorgeous😍’, ‘Lovely🔥’, ‘🌹🌹 rupali i love u yarrr 😘😘’, ‘Looking Beautiful Rupali !!! 😍 ❤️🙌🙌Keep Rising n Keep Shining as Always ✨️✨️✨️❤️’, यासारख्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांच्या हार्ट आणि फायरच्या इमोजींनी कमेंट्स सेक्शनचा बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास २० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. ‘आई कुठे काय करते!’ या मालिकेतील अभिनयासोबत रूपाली सोशल मीडियावर सक्रिय असते.

हेही वाचलंत का? 

Back to top button