Group Chat Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर ग्रुपवर करता येणार १०२४ जणांना चॅट | पुढारी

Group Chat Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर ग्रुपवर करता येणार १०२४ जणांना चॅट

पुढारी ऑनलाईन: इन्स्टंट मेसेज अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने भारतासह जगभरात आपले ‘कम्युनिटी’ (Group Chat Feature) फिचर सुरू करत असल्याची घोषणा केली होती. काही काळापूर्वी याची चाचणी सुरू करण्यात आली होती. आता लवकरच हे  वापरात येणार असल्याचे माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे. हे नवीन फिचर ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढविण्याबरोबरच अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला एकाच प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी एकमेकांशी बोलण्याची परवानगी देते. येऊ घातलेल्या या नवीन फिचर्सची यूजर्समध्येदेखील उत्सुकता आहे.

या फिचरबरोबर व्हॉट्सअ‍ॅप अनेक नवीन फीचर्ससुद्धा घेऊन येत आहे. यामधील सर्वात महत्त्वाचे फिचर म्हणजे आता एका ग्रुप व्हिडिओ कॉलवर ३२ जणांना एकाचवेळी जोडता येणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपने एका ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्यांची मर्यादा देखील कित्येक पटीने वाढवली आहे. पूर्वी व्हॉट्सअ‍ॅपमधील एका ग्रुपमध्ये २५६ जणांना अॅड करता येत होते. आता हीच मर्यादा कंपनीने हे नवीन फिचर आणत १०२४ (Group Chat Feature) इतकी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गुरूवारी व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेली कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेनबर्ग यांनी कम्युनिटीज् (Group Chat Feature) या जागतिक रोलआऊटची घोषणा केली. या फिचरनुसार वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांना सामुदायिक संवादाची सुविधा दिली जाणार आहे. कम्युनिटीज् या नव्या फिचरमध्ये अ‍ॅडमिनला नवीन टूल्स देण्यात येणार असल्याचे झुकेरबर्ग यांनी सांगितले आहे. यामध्ये कोणत्या मेसेजला कोणत्या ग्रुपवर पाठवायचे हे अ‍ॅडमिनच्या हातात असणार आहे.

मार्क झुकेनबर्ग एका निवेदानात म्हटले आहे, आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू करत असलेल्या या नवीन फिचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणखी मजबूत होण्यास मदत होतील. मार्क म्हणाले की, सर्व फिचर्स हे एनक्रिप्शनसह पूर्णपणे सुरक्षित आहेत, म्हणजेच तुमचा संवाद हा पूर्णपणे खाजगी राहतो, असेही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mark Zuckerberg (@zuck)

येत्या काही महिन्यांत व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी फिचर प्रत्येकासाठी उपलब्ध होईल. त्याचा फायदा शाळा, स्थानिक क्लब, स्वयंसेवी संस्था इत्यादींना होणे अपेक्षित आहे. याच्या मदतीने, शाळा, निवासी सोसायटी, मित्रांना एकाच ठिकाणी आणले जाऊ शकते. म्हणजे अनेक  ग्रुप्स एकत्र करून व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी तयार केली जाईल. हे वैशिष्ट्य टेलिग्राम आणि iMessage सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करेल, असेही मार्क झुकेनबर्गने म्हटले आहे.

हेही  वाचा:

Back to top button