व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या वापरावर कर लादताच ‘या’ देशात हिंसाचार | पुढारी

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या वापरावर कर लादताच ‘या’ देशात हिंसाचार

लेबनॉन : पुढारी ऑनलाईन 


लेबनॉन सरकारने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाचा तेथील नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. देशातील अनेक ठोकाणी निर्दर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी नागरिकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. 

स्मार्टफोन हा आजच्या घडीला सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला असून सोशल मीडियाशिवाय जगणेही कठिण झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते. सोशल मीडियावर एखाद्या देशात जत काही बंधणे घातली गेली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचे ताजे उदाहरण लेबनॉनमध्ये पहायला मिळत आहे. लेबनॉन सरकारने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांवर कर लावण्याचा निर्णय घेतला आणि नागरिकांनी या निर्णयाचा विरोध करत संपूर्ण शहरात हिंसक आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांनी फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर लावण्यात आलेला कर मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर यावर विचार करत सरकारने हा कर मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यानंतरही लोकांचा राग मात्र शांत झालेला नाही. कर मागे घेतल्यानंतरही लोकांनी मोठ्या प्रमाणात शहरात जाळपोळ केल्याचे पहायला मिळाले. 

सरकारने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कॉलसाठी ०.२० डॉलर्सचा कर लावणअयाचा निर्णय घेण्यात आला होता. १७ ऑक्टोबर रोजी हा निर्णय घेतला होता. लेबनॉन सध्या बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत असून त्यातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला कॉल केल्यास त्यावर कर आकारण्यात येणार होता.

सरकारच्या या निर्णयानंतर लोकांनी रस्त्यावर उतरत मोठे आंदोलन केले. त्यानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये अनेक वाद झाले. नागरिकांनी आंदोलनाला हिंसक रूप दिले. आंदोलन हिंसक झाल्याचे पाहताच सरकारने हा सोशल मीडियावर कर लादण्याचा निर्णय मागे घेतला. 

Back to top button