

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२० मध्ये राज्याबाहेर गेलेला प्रकल्प हा मोबाईल फोन संबंधित होता. राज्यातून आता गेलेला प्रकल्प हा फॉक्सकॉन प्रकल्प सेमीकंडक्टरचा आहे. फडणवीस सांगत असलेला फॉक्सकॉनचा प्रकल्प दुसराच आहे, असे प्रत्युत्तर आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. (Aditya Thackeray Live)
राज्यातील प्रकल्प हे गुजरातमध्ये जात असल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली होती. यानंतर मविआ सरकारची भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्राला एका मोठ्या प्रकल्पाचं एक गाजर दिले आहे. राज्यातील अनेक उद्योग इतर राज्यात गेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून याबाबत उत्तर येणे अपेक्षित होते. पण तसे होत नाहीए. उपमुख्यमंत्री एकटेच यावर बोलत आहेत." (Aditya Thackeray Live)
मे महिन्यात आलेला नव्या प्रकल्पाचे श्रेय शिंदे सरकारने घेतले आहे. शिंदे सरकारने सांगितलेला हा प्रकल्प मविआ सरकारच्या काळात राज्यात आला आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात उद्योगासाठी चांगले वातावरण नाही, असे सांगणाऱ्यांची नावे सांगा असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना दिले. आम्ही आमच्या सरकारच्या काळात गुंतवणूक वाढवत होतो, असा दावाही त्यांनी केली. जर आमच्या काळात हा प्रकल्प गेला आहे तर शिंदे यांनी कोणाची भेट घेतली? विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती का दिली असा सवाल देखील उपस्थित केला.
प्रकल्प गेल्यनंतरच्या आंदोलनकर्त्या बेरोजगार तरूणांना फडणवीस शेंबडी पोरं म्हणत आहेत. हे योग्य आहे का असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांसोबत प्रकल्पांबाबतच्या मुद्यांवरील चर्चेसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावरून शिंदे सरकारवर त्यांनी टीका केली. राजकीय कार्यकर्त्यांसाठी समृद्धी महामार्ग खुला आहे मग सामान्य जनतेसाठी का खुला नाही असा सवाल त्यांनी यावेळेस केला.
हेही वाचा