Rinku Rajguru : क्यूटनेस ओव्हरलोड 😍; वाह काय ते आर्चीचं लाजणं अन्… | पुढारी

 Rinku Rajguru : क्यूटनेस ओव्हरलोड 😍; वाह काय ते आर्चीचं लाजणं अन्...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सैराट’, ‘कागर’, ‘झुंड’, ‘मेकअप’ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने अल्पावधीतच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. रिंकूने सोशल मीडियावर सक्रिय असून, चाहत्यांसाठी फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या रिंकूने आणखी एक धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने  ( Rinku Rajguru ) तिच्या इन्स्टाग्रामवर एक दिवाळीच्या मुहूर्तावर जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील व्हिडीओ शेअर केला आहे. नुकतीच रिंकने तिच्या फॅमिलीसोबत हटके अंदाजात दिवाळी साजरी केली आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊडला ‘उसके ओठों पे अच्छा लगता है मेरा नाम, ऐसे क्यॅू.. कुछ भी बोले ओ मन में घुलता है जफरार……’ असे हिंदी गाणे वाजत आहे. मोकळे केस, कानात मोत्याची फुले, गळ्यात मोत्याचा नाजूकसा हार, कपाळावर टिकली, मेकअप आणि लिपस्टिकने तिच्या सौदर्यात भर घातली आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमद्ये तिने ‘मला माहित आहे की, मी परिपूर्ण नाही, पण माझा स्वतःवर विश्वास आहे.🌈💜’. असे म्हटलं आहे. रिंकूच्या लाजणं, हसण्यावर चाहते फिदा झाले आहेत. याआधीही रिंकू निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोत तिच्या हटके अंदाजासोबत ती पारंपरिक वेशभूषेत खूपच क्यूट दिसतेय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका नेटकऱ्याने ‘Keep believing urself n keep growing, more stronger n always keep smiling 🤗✨❤️’, ‘Beautiful❤️’, ‘Cuteness overload 😍🥰🥰😘👌’, ‘Ohhhh💙🔥’, ‘Superb…. 👌👌❤️❤️big fan of u…. Frm south…., Superb 😍’, ‘Beautiful smile 👌😘😍❤️❤️’, ‘Graceful smile 😍’, ‘Very very beautiful Love 👏🔥🙌❤️🙌❤️’, ‘Gorgeous😍🔥❤️🙌’, ‘❤️❤️❤️ Khupach Sundar’, ‘Looking pretty 😍’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहे. या व्हिडिओला आतापर्यत जवळपास १ तासांत ५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button