अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ : अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आर्डे यांचे निधन | पुढारी

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ : अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आर्डे यांचे निधन

पुढारी ऑनलाईन: डॉ. दाभोलकर यांच्यानंतर अंनिस चळवळीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, संपादक प्रा. प. रा. आर्डे यांचे आज पहाटे निधन झाले. ते अंनिसच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत धडाडीने कार्य करणारे कार्यकर्ते होते.

ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संपादक आर्डे यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे तब्बल २० वर्षे संपादक पद भूषविले आहे. ते विज्ञानाचे अभ्यासक तसेच सुप्रसिद्ध वक्ते देखिल होते. याप्रसंगी प्रा. प. रा. आर्डे यांच्या जाण्याने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आधारवड हरवला असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

Back to top button