‘ऑपरेशन परिवर्तन’मध्ये ‘अंनिस’ काम करणार | पुढारी

‘ऑपरेशन परिवर्तन’मध्ये ‘अंनिस’ काम करणार

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी जिल्ह्यात बालविवाह प्रथेच्या विरोधात ऑपरेशन परिवर्तन चळवळ सुरु केली आहे. या अभियात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन सोलापूर शाखा सहभागी होण्यास तयार असल्याचे निवेदन सोलापूर ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांना देण्यात आले.

अनिस शहर शाखेच्या महिला विभाग प्रमुख डॉ. अस्मिता बालगावकर यांनी हे निवेदन दिले. यावेळी शहर अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, कार्याध्यक्ष व्ही. डी. गायकवाड, ‘अंनिस’सचिव लालनाथ चव्हाण, राज्य बुवाबाजी संघर्ष समितीचे कार्यकारिणी सदस्य केदारीनाथ सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर ‘अंनिस’च्या वतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्याने, प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सरिता मोकाशी, राज्य कार्यकारिणी सदस्य निशा भोसले, लता ढेरे, डॉ. अस्मिता बालगावकर, काँ. रवींद्र मोकाशी, केदारीनाथ सुरवसे , आर.डी. गायकवाड, मधुरा सलवारू, उषा शहा सहभागी होणार आहेत, असे कार्याध्यक्ष व्ही. डी. गायकवाड आदी उपस्थित होते.

Back to top button