Facebook Password : चक्क १० लाख फेसबुक युझर्सचे पासवर्ड चोरीस; या १० लाखांमध्ये तुम्ही तर नाही ना?

Facebook
Facebook
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या घडीला क्वचितच एखादं असेल जो फेसबुक वापरत नाही. जगभरातील अब्जावधी लोक फेसबुक या सोशल साइटचा वापर करताना तुम्हाला दिसत असतील. संवादाचं एक चांगली सोशल साईट म्हणून फेसबुककडे पाहिलं जातं. पण फेसबुकच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी (Facebook Password ) समोर येत आहे. चक्क १० लाख फेसबुक युझर्सचे पासवर्ड चोरीस गेले. वाचा नेमके काय आहे प्रकरण.

फेसबुकने माहिती दिला आहे की, अंदाजे दहा लाख फेसबुक युजर्सचे युजरनेम आणि पासवर्ड चोरीला गेले आहेत. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. या १० दहा लाखांमध्ये आपण तर नाही ना? फेसबुकने (Meta Platforms Inc.) यावर खुलासा केला आहे की,  अंदाजे १० लाख फेसबुक युजरनेम आणि पासवर्ड चोरीला गेले आहेत. या वापरकर्त्यांनी Apple Inc. आणि Alphabet Inc. च्या सॉफ्टवेअर स्टोअर्सवरून डाउनलोड केलेल्या ॲप्सच्या सुरक्षा समस्यांमुळे त्यांच्या फेसबुकची सुरक्षा धोक्यात आली आहे.

फेसबुक कंपनीने शुक्रवारी (दि.७) सांगितले की त्यांनी या वर्षी 400 हून अधिक  Android आणि iOS ॲप्स ओळखले आहेत जे इंटरनेट वापरकर्त्यांचे त्यांचे लॉगिन माहिती चोरण्यासाठी वापरतात. कंपनीने म्हटले आहे की ही "ॲप काढण्यासाठी ॲपल आणि गुगलला या बद्दल सांगितले आहे." फेसबुकने असेही म्हंटले आहे की ही ॲप फोटो एडिटर, मोबाइल गेम किंवा हेल्थ ट्रॅकर अशा स्वरुपाची आहेत. ही अ‍ॅप्स युजर्सच्या फेसबुक अकाउंटवरून लॉग इन करत होते. त्यानंतर ते युझर्सचा सर्व प्रकारचे एक्सेस घेत होते. 

Facebook Password : Apple आणि Google ची भूमिका?

माहिती देताना गुगलने ॲपलने सांगितले की, त्यांनी त्यांच्या अॅप स्टोअरमधून 400 पैकी 45 संशयग्रस्त ॲप्स ती त्यांच्या स्वतःच्या तपासणी प्रणालीद्वारे प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आली आहेत. 

मात्र, ज्या यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे त्यांचा डेटा रिकव्हर झाला आहे की नाही हे मेटाने सांगितलेले नाही. मात्र या माहितीनंतर तंत्रज्ञान विश्वात खळबळ उडाली आहे. या आधीही अनेकवेळा फेसबुक यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news