Honda Electric Scooter : होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार लाँच...ॲक्टिवापेक्षाही कमी असेल किंमत | पुढारी

Honda Electric Scooter : होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार लाँच...ॲक्टिवापेक्षाही कमी असेल किंमत

पुढारी वृत्तसेवा :  Honda Electric Scooter ‘होंडा मोटरसायकल ॲण्ड स्कूटर इंडिया’ लवकरच भारतात आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करू शकते. नवीन ॲडव्हान्स फिचर्स असणाऱ्या या स्कूटरची किंमत ॲक्टिवापेक्षाही कमी असेल, असे सांगण्यात येत आहे. ज्यांना गेल्या अनेक दिवसांपासून स्कूटर घेण्याची ईच्छा आहे त्या ग्राहकांसाठी ही निश्चितच आनंदाची गोष्ट असणार आहे.

Honda Electric Scooter या स्कूटरची किंमत 72 हजारापेक्षा कमी असेल. 2023- 2024 ला ही स्कूटर लॉंच होणार आहे. ग्राहकांना कमी किंमतीत सर्वोत्तम फिचर्स देण्याची योजना होंडाची असल्याने सर्वोत्तम फिचर्स असलेली स्कूटर ग्राहकांना मिळावी, यासाठी होंडा प्रयत्नशील आहे, असे होंडा कंपनीने स्पष्ट केले आहे.

Honda Electric Scooter एचएमआईचे अध्यक्ष अत्सुशी ओगाटा यांच्या अनुसार, संपूर्ण रिसर्च करून ही स्कूटर बनवण्यात येत आहे. सध्या मॉडेलवर काम सुरू असून ते विकासाच्या प्रक्रियेत आहे. याबरोबरच आणखी दोन मॉडेल लवकरच लॉंच करण्याच्या मार्गावर आहेत, ओगासा यांनी याबाबत पुष्टी केली. पुढील दहा वर्षापर्यंत एक मिलीयन ’10 लाख’ इलेक्ट्रिक व्हेईकलची विक्री करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे, असे एचएमआईचे अध्यक्ष अत्सुशी ओगाटा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मार्केट रिसर्चनुसार ईलेक्ट्रिक व्हेईकलचा बाजार 2030 पर्यंत 30 लाख युनिटपर्यंत जाईल, असेही होंडा कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

हे असू शकतात फीचर्स

ई स्कूटर असेल एकदम स्टायलिश

कंपनीच्या माहितीनुसार 60 किमी प्रतितास इतका वेग असेल

तर ॲक्टिवापेक्षाही कमी किंमत हे याचे मुख्य आकर्षण असेल

हेही वाचलंत का ?

Back to top button