Gulabrao Patil : आमच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेबांचा आत्मा येईल | पुढारी

Gulabrao Patil : आमच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेबांचा आत्मा येईल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना पक्षातील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जळगावात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल, असे ते म्हणाले.

आमचा मेळावा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा असून, ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या संमिश्र विचारांचा मेळावा असेल, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमचे नाते हिंदुत्वाशी आहे. त्यामुळे त्यांचं नातं कोणाशी आहे? असा प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. मधल्या काळात आम्ही हिंदुत्वाचा विचार सोडून दुसर्‍या ट्रॅकला गेलो होतो. पण आता पुन्हा हिंदुत्वाच्या विचारांसाठी भगवा झेंडा आम्ही हाती घेतला आहे, असे म्हणत त्यांनी अजेंडादेखील स्पष्ट केला.

जुगार अड्ड्यावरूनही साधला निशाणा…
शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या परिसरातील मटका अड्ड्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावलेल्या मागील बाजूस जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे उघड झाल्याने पाटील म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे कार्यालय हे न्यायदेवतेचे कार्यालय असते. त्यामुळे अशा ठिकाणी सट्टा अड्डा चालविणे ही निषेधार्ह बाब आहे. शिंदे गटातील ज्या महिला पदाधिकार्‍याने सट्ट्याचा अड्डा उधळून लावला आहे, त्यांचे मी स्वागत करतो.

हेही वाचा :

Back to top button