नगर शहरात दुसर्‍या दिवशीही जोरधार | पुढारी

नगर शहरात दुसर्‍या दिवशीही जोरधार

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहर व तालुक्यात मंगळवारी देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागाला तळ्यांचे स्वरुप आले. या पावसामुळे पिंपळगाव माळवी तलावातून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नगर-वांबोरी रस्ता बंद करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 13.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभर संततधार सुरु होती. दोन- तीन वेळा झालेल्या जोरदार पावसाने शहरात पाणीच पाणी झाले होते.नगरकरांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. सोमवारी नगर तालुक्यात सर्वाधिक 21.6, श्रीरामपूर 16.8, कोपरगाव 29.6, नेवासा 19.2, पारनेर 16.1 मि.मी. पाऊस झाला.

नगर तालुक्यातील नालेगाव महसूल मंडलात 18.8, सावेडी मंडलात 27.3, कापूरवाडी 16, केडगाव 20.3, भिंगार 18, नागापूर 30.5, जेऊर 15.3, चिचोंडी पाटील 22.8, वाळकी 19.8, चास 14.3 व रुईछत्तीशी मंडलात 34.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.
दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी सूर्यदर्शन झाले. त्यानंतर दुपारपासून आभाळ भरुन आले होते. सायंकाळी मात्र, उत्तरा नक्षत्राने नगर शहर व तालुक्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली. सावेडी, तारकपूर, नवी पेठ, माळीवाडा बसस्थानक, एमआयडीसी आदी भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. सखल भागात पाणी साचून त्यांना तळ्यांचे स्वरुप आले होते.गेल या पावसाने शहरात गारवा पसरला होता.गेल्या चारपाच दिवसांपासून शहर आणि परिसरात पाऊस सुरु आहे. सूर्यदर्शन होत नसल्यामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.

Back to top button