WhatsApp latest version : व्हॉट्स ॲपच्या नव्या फिचरमध्ये गडबड? आपोआप बदलते ‘म्यूट’ सेटिंग! | पुढारी

WhatsApp latest version : व्हॉट्स ॲपच्या नव्या फिचरमध्ये गडबड? आपोआप बदलते 'म्यूट' सेटिंग!

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सोशल मीडिया युझर्समध्ये सध्या लोकप्रिय कोणतं माध्यम असेल तर ते म्हणजे  व्हॉट्सॲप. व्हॉट्स अ‍ॅप युझर फ्रेंडली आहे. त्याचबरोबर सतत नवनवे फिचर येत असल्याने हे ॲप सोशल मिडिया युझर्समध्ये लोकप्रिय आहे. नेहमी नवनवे फिचर येत असल्याने हल्ली सोशल मीडिया युझर्समध्ये  त्याची लोकप्रियताही वाढू लागली आहे; पण लेटेस्ट  व्हॉट्स अ‍ॅप व्हर्जन अपडेट केल्यानंतर ‘म्यूट’ सेटिंगमध्ये अडचणी (WhatsApp latest version) येत असल्‍याच्‍या तक्रारी काही युझर्सकडून हाेत आहेत.
मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये व्हॉट्स अ‍ॅपकडून नेहमी काही ना काही अपडेट येत असतात. काही दिवसापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये अडचणी येवू लागल्या आहेत. IOS डिवाईससाठी केलेले लेटेस्ट व्हर्जन २.२२.१८७६ मध्ये काही युझर्सच्या अ‍ॅप सेटींगमध्ये आपोआप  बदल हाेत आहे. युझर्सकडून तक्रार केली जात आहे की, जेव्हा ते कोणत्या तरी ग्रुप किंवा एखाद्या व्यक्तीचे मेसेज म्युट करतात तेव्हा त्यामध्ये अडचणी येताना दिसतात.

WhatsApp latest version : अपडेटनंतर  ‘म्यूट’च्‍या कालावधीत बदल 

काही आयफोन युझर्सच म्हणणे आहे की, लेटेस्ट  व्हॉट्स अ‍ॅप व्हर्जन अपडेट केल्यानंतर जेव्हा ते कोणाला तरी चॅटमध्ये १ आठवड्यासाठी म्युट करत असतात तेव्हा ते ड्युरेशन १ आठवड्याचं ८ तासांच होत. पण युझर्स म्युट करत असताना ८ तास किंवा कायम (Always) हा पर्याय निवडतात तेव्हा काही अडचण येत नाही. ज्या युझर्सनी अपडेट केलेले नाही त्यांना काही अडचण येत नसल्‍याचे काही युजर्सच्‍या निदर्शनास आले आहे.
हेही वाचलंत का?

 

Back to top button