WhatsApp Accounts Banned: व्हॉट्सॲपने केले २० लाखांहून अधिक अकाउंट्स बंद | पुढारी

WhatsApp Accounts Banned: व्हॉट्सॲपने केले २० लाखांहून अधिक अकाउंट्स बंद

पुढारी ऑनलाईन : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने कंपनीचे नियम व अटी मोडणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. याअंतर्गत व्हॉट्सॲपने जून महिन्यात तब्बल २२ लाख यूजर्संची व्हॉट्सॲप अकाउंट्सवर बंद (WhatsApp Accounts Banned) केली आहेत. तर जुलैमध्ये २० लाखांहून अधिक अकाउंट्सवर बंदी घातली आहे. जूनसाठी जाहीर झालेल्या अहवालाच्या तुलनेत हा उच्चांक आहे. कंपनीच्या काही नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲपचा १ जून ते ३० जून पर्यंतचा अहवाल समोर आला आहे. जुलै महिन्यात व्हॉट्सॲपने २० लाखांहून अधिक अकाउंट्सवर घातली बंदी घातली आहे. आत्तापर्यंत व्हॉट्सॲपने २२ लाख यूजर्संच्या अकाऊंटवर बंदी (WhatsApp Accounts Banned) घातली आहे, तर ३ लाख व्हॉट्सॲप यूजर्संना नोटीस पाठवली आहे. यापूर्वी व्हॉट्सॲपने मार्चमध्ये १८ लाखांहून अधिक, एप्रिलमध्ये १६ लाख तर, मे मध्ये १९ लाख व्हॉट्सॲप यूजर्संची अकाऊंट बंद केली होती.

तुमचेही खाते होऊ शकते बंद, ही घ्या काळजी

जर कोणी बेकायदेशीर, धमकी देणारा, द्वेष पसरविणारा, भेदभाव करणारा चुकीचा मजकूर शेअर करत असेल तर तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंट्सवर बंदी घातली जाऊ शकते. तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट्स (WhatsApp Accounts Banned) सुरक्षित ठेवायचे असेल तर असा मजकूर असलेला कोणत्याही मेसेजसा प्रोत्साहन देऊ नका. तुमच्या व्हॉट्सॲपवर असा कोणताही मेसेज आल्यास किंवा कोणत्याही व्यक्तीकडून तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत असेल तर संबंधित कंपनीकडे तक्रार नोंदवने गरजेची आहे.

हेही वाचा:

 

 

Back to top button