#१२ आमदार नियुक्ती: मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राज्यपाल म्हणाले, लवकरच…

#१२ आमदार नियुक्ती: मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राज्यपाल म्हणाले, लवकरच…

मुंबई, पुढारी ऑनलाईन : विधानपरिषदेच्या #१२ आमदार नियुक्ती बाबत आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विनंती केली आहे. या नावांचा ठराव पाठवून बराच कालावधी झाला आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घ्या, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

त्यामुळे लवकर निर्णय होईल असे वाटते, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विधानपरिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिली नाही. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत.

१२ जणांच्या यादीतील काही नावांना आक्षेप घेण्यात आल्याचेही समजते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

या भेटीत राज्यातील पाऊस आणि अन्य परिस्थिबाबत राज्यापालांना माहिती दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

तसेच आठ महिन्यांपूर्वी कॅबिनेट मिटिंगमध्ये केलेल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या ठरावाचीही आठवण करून दिली.

या ठरावाबाबत अद्याप आपण कुठलीही कार्यवाही केलेली नाही. विधीमंडळांच्या अधिवेशनात विधानपरिषदेचे संख्याबळ पुरेसे नसल्याची बाबही आम्ही निदर्शनास आणून दिली.

राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकूण घेतले.आम्ही पाठविलेल्या यादीबाबत आक्षेप नसल्याचेही ते म्हणाले.

ही यादी कधी मंजूर करायची हा आपला अधिकार आहे. तरीही लवकरात लवकर या यादीला मंजुरी द्यावी, अशी विनंती आम्ही केली आहे.

आमचे सर्व म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर त्यांनी मी याबाबत योग्य निर्णय घेईन, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

१२ नावांची यादीत कोण?

काँग्रेस : सचिन सावंत(सहकार आणि समाजसेवा), मुझफ्फर हुसैन(समाजसेवा), रजनी पाटील, अनिरुद्ध वणकर
राष्ट्रवादी काँग्रेस : एकनाथ खडसे(सहकार आणि समाजसेवा), राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा), प्रा. यशपाल भिंगे (साहित्यिक), आनंद शिंदे(कला)

हेही वाचा: 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news