राज्यातील 3 लाख 80 हजार विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती

राज्यातील 3 लाख 80 हजार विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यातील विविध महाविद्यालयांमधून वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीमधील सुमारे तीन लाख 80 हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत सुमारे 700 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. आता मात्र केवळ एक टक्का विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती प्रलंबित राहिली असल्याचा दावा समाज कल्याण विभागाने केला आहे. दरम्यान, उर्वरित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीदेखील येत्या महिनाभरात देण्यात येणार आहे.

राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेली शिष्यवृत्ती राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालय स्तरावर महाडीबीटी या डॅशबोर्डच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी या शिष्यवृत्तीचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. ही मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे.

समाज कल्याण विभागाच्या वतीने सन 2022-23 या सालासाठी शिष्यवृत्ती मागविलेल्या ऑनलाईन अर्जानुसार साडेचार लाखांहून अधिक विविध शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यातील काही विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे प्रलंबित राहिले आहेत. या प्रलंबित अर्जाची छाननी सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news