फ्रान्समध्ये महापौरांच्या घरावर हल्ला

फ्रान्समध्ये महापौरांच्या घरावर हल्ला

पॅरिस, वृत्तसंस्था : फ्रान्समध्ये महापौर विन्सेंट जेन्बर्न यांच्या घरावर हल्ला केला असून, यामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी राबविलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये 719 आंदोलनकर्त्यांना अटक केली असून, आतापर्यंत 1 हजार 700 लोकांना अटक केली आहे

एका 17 वर्षांच्या नाहेल नावाच्या मुलाची पोलिसाकडून गोळी झाडून हत्या झाल्यानंतर फ्रान्समधील हिंसाचार अद्याप सुरूच आहे. यामुळे आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांनी आपला जर्मनीचा दौरा रद्द केला आहे. त्यांनी जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वाल्टर स्टीनमीअर यांच्याशी चर्चा केली आणि दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मॅक्रो तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौर्‍यावर जाणार होते. नाहेल याच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याचदरम्यान ब्रिटिश गायक एल्टन जॉन याच्या संगीत कार्यक्रमात मॅक्रो एन्जॉय करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे मॅक्रो यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांची ही बेजाबदार वर्तणूक असल्याचे सोशल मीडियावरून म्हटले जात आहे. फ्रान्समधील हिंसाचार बेल्जियमपर्यंत पोहोचला आहे. बेल्जियमच्या अंतर्गत खात्याचे मंत्री गेरॉल्ड डर्मेनिन यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांनी आतापर्यंत देशभरात 2 हजारांपेक्षा अधिक मोटारी जाळल्या आहेत. यावेळी 200 पेक्षा अधिक पोलिस जखमी झाले आहेत. समाजकंठकांनी 700 पेक्षा अधिक दुकाने, सुपरमार्केटस्, रेस्टारंट आणि बँकांना आग लावली आणि त्यांची तोडफोड केली आहे.

आणीबाणी लागू होण्याची शक्यता

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार फ्रान्समध्ये आंदोलनकर्त्यांनी 500 पेक्षा अधिक इमारतींचे नुकसान केले आहे आणि सुमारे 4 हजार ठिकाणी आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 2 हजार मोटारी खाक झाल्या आहेत. बेल्जियमची राजधानी ब—ुसेल्समध्ये हिंसाचारप्रकरणी 100 लोकांना अटक केली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी देशात आणीबाणी लागू करण्याची शक्यता असल्याचे फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news