Himachal Pradesh Flood : मंडी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार १३ जणांचा मृत्यू; ६ बेपत्ता | पुढारी

Himachal Pradesh Flood : मंडी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार १३ जणांचा मृत्यू; ६ बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील काल झालेल्या मुसळधार पावसात (Himachal Pradesh Flood) १३ लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर सहा लोक बेपत्ता आहेत. एनडीआरएफच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोधमोहीम सुरु राहील असे मंडी जिल्ह्याचे उपायुक्त अरिंदम चौधरी यांनी सांगितले.

प्रशासन सर्व लोकांची माहिती घेत आहे. जिथे पूर परिस्थिती आहे तिथे मदत दिली जात आहे. बऱ्याच ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. धरमपूर येथील बसस्थानक पाण्याखाली गेले आहे. त्याचबरोबर धरमपूर जवळील शिव मंदिर आणि सत्संग भवनही पाण्याखाली गेले आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मंडी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही पावसामुळे नुकसान झाले आहे. मंडी-कुल्लू रोड स्थगित करण्यात आला आहे. कांगडा जिल्ह्यातील काही मार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आले आहेत.

Himachal Pradesh Flood : धर्मशाळेत ६४ वर्षांनंतर रेकॉर्डब्रेक ३३३ मिलीमीटर पाऊस

शुक्रवारी रात्री धर्मशाळेत सर्वात अधिक ३३३ मिलीमीटर असा ६४ वर्षांनंतर रेकॉर्डब्रेक मुसळधार पाऊस झाला. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग धोकादायक बनले आहेत. हिमाचल प्रदेशच्या चंबा – पठाणकोट महामार्गावर पावसामुळे रस्ता खचल्याने बसचा अपघात होता-होता राहिला आहे. बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. पावसामुळे अनेक राष्ट्रीय तसेच राज्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे राज्यात पूरस्थिती देखील गंभीर बनली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button