

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची माहिती अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे. अमृता यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना…. लफ़्ज़ नए है , पर रंग वही सुहाना …… ! Thank you @saregamaglobal, Coming up ….."
अमृता यांनी हे गाणे या गाण्याची संधी दिल्याबद्दल RPSG ग्रुप कंपनीला ट्विट करत त्यांचेही आभार मानले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या सोशल मीडियावरील पोस्ट, राजकीय टीका आणि त्यांच्या गाण्याच्या आवडीने नेहमीच मीडियामध्ये चर्चेत असतात. यापूर्वी नारी मनहारी, सुकूमारी, गणेश वंदना तसेच शिवतांडव स्त्रोत देखील अमृता यांनी गायिले होते.