Whatsapp Payments करताय? तर 'हे' आकर्षक फिचर वापरलं का? | पुढारी

Whatsapp Payments करताय? तर 'हे' आकर्षक फिचर वापरलं का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया अ‍ॅप्स कंपन्यांसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे इथले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी या कंपन्या स्वतःला सातत्याने अपडेट ठेवत असतात. आता व्हाॅट्सअ‍ॅपनेदेखील मनी ट्रान्सफर सेगमेंटमध्ये (Whatsapp Payments) नवं फिचर जोडलं आहे. त्याचं  Payments Backgrounds असं नाव आहे.

व्हाॅट्सअ‍ॅप युजर्सना पेमेंट केल्यानंचर पर्सनल टच देता यावा, यासाठी हे फिचर व्हाॅट्सअ‍ॅपने आणलं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नातेवाईला किंवा मित्रांना व्हाॅट्सअ‍ॅप पेमेंटनरून पैसे पाठवता, त्यावेळी त्यामुळे या नव्या फिचरचा वापर करून एक साजेशा बॅकग्राऊंड निवडता येतं.

एंड्राॅइड आणि आयओएस या दोन्हींमध्येही हे फिचर युजर्सना वापरता येणार आहे. व्हाॅट्सअ‍ॅप कंपनीचं असं म्हणणं आहे की, जेव्हा एखादा युजर्स पेमेंट (Whatsapp Payments) करेल, त्याबरोबर त्याच्या भावनाही पाठवता याव्यात यासाठी हे फिचर देण्यात आलं आहे.

या नव्या फिचरमध्ये एकूण ७ बॅकग्राऊंड आहेत. यामध्ये हाॅलि-डे, बर्थ-डे आि ट्रॅव्हलिंग, असेही बॅकग्राऊंड वापरता येणार आहेत. तसेच येत्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर थीम-बेस्ड बॅकग्राऊंडदेखील बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनाच्या सणाला याचा वापर करू शकता.

Payments Backgrounds कसा वापर कराल?

व्हाॅट्सअ‍ॅप पेमेंटवर तुम्ही जेव्हा पेमेंट करणार आहात, तेव्हा पेमेंट बाॅकग्राऊंड निवडण्यासाठी ‘Sand Payment’ या स्क्रीन बॅकग्राऊंडवर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर बॅकग्राऊंड यादी येईल. त्यातील तुम्हाला हवी असणारी बॅकग्राऊंड निवडा.

इतकंच नाही, तुम्ही पेमेंटसोबत पेमेंट करण्याचे कारण किंवा शुभेच्छादेखील करू शकता. जेव्हा तुम्ही हा पर्याय वापरता, तेव्हा तुमचं पेमेंट जी व्यक्ती घेणार आहे तिला ही बॅकग्राऊंड मिळणार आहे.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button