Venezuela Gold Mine | व्हेनेझुएलामध्ये सोन्याची खाण कोसळून २३ ठार, थरारक व्हिडिओ आला समोर

Venezuela Gold Mine | व्हेनेझुएलामध्ये सोन्याची खाण कोसळून २३ ठार, थरारक व्हिडिओ आला समोर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : व्हेनेझुएलामध्ये (Venezuela Gold Mine) बेकायदेशीरपणे चालवण्यात येत असलेली सोन्याची खाण कोसळून किमान २३ जण ठार झाले आहेत. स्थानिक अधिकारी योर्गी अर्सिनिएगा यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना या घटनेविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बोलिव्हर राज्यातील जंगलात बुल्ला लोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुल्या खड्ड्यातील खाणीतून सुमारे २३ मृतदेह बाहेर काढले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी झाली होती. काल बुधवारी या खाणीत २३ मृतदेह आढळून आले.

नागरी संरक्षण उपमंत्री कार्लोस पेरेझ अँप्युइडा यांनी X वर या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात एका खुल्या खाणीत काम करत असलेल्या लोकांवर खाण हळूहळू कोसळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. काही जण खाणीतून बाहेर पडताना दिसत आहेत. तर काहीजण त्यात अडकले आहेत.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खाणीत सुमारे २०० लोक काम करत आहेत. ते जवळच्या शहर ला पॅराग्वा येथून सात तासांचा बोटीतून प्रवास करुन येथे आले होते.

बोलिव्हर राज्याचे नागरिक सुरक्षा सचिव एडगर कोलिना रेयेस यांनी सांगितले की, खाण दुर्घटनेतील जखमींना राजधानी कराकसच्या आग्नेयेला ७५० किलोमीटरवर (४६० मैल) ला पॅराग्वा पासून चार तासांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेले जात आहे. शोधकार्यात मदत करण्यासाठी कराकसमधून बचावपथकेही पाठवण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.

बोलिव्हर प्रदेश हा सोने, हिरे, लोह, बॉक्साईट, क्वार्ट्ज आणि कोल्टन आदी खनिज संपत्तीने समृद्ध आहे. येथे राज्याच्या खाणींव्यतिरिक्त बेकायदेशीर उत्खननही मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याच प्रदेशातील इकाबारू या आदिवासी भागातील खाण कोसळून किमान १२ जणांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news