Virat Kohlis instagram post : ”२३ ऑक्‍टोबर नेहमीच माझ्‍यासाठी विशेष…” विराट कोहलीची पोस्‍ट चर्चेत…

Virat Kohlis instagram post : ”२३ ऑक्‍टोबर नेहमीच माझ्‍यासाठी विशेष…” विराट कोहलीची पोस्‍ट चर्चेत…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नुकत्‍याच झालेल्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्‍तान यांच्‍यात झालेल्‍या सामना सर्वांच्‍या स्‍मरणात आहे. या सामन्‍यामध्‍ये विराट कोहलीची खेळी अविस्‍मरणीय ठरली. या सामन्‍यात विराटची ८२ धावांची खेळी क्रिकेटच्‍या इतिहासात सुवर्णक्षरांनी नोंदली गेली. या खेळीचे विराटला पुन्‍हा एकदा स्‍मरण झाले आहे. ( Virat Kohlis instagram post) या सामन्‍याबद्दल त्याने इंस्‍टाग्रामवर केलेली पोस्‍ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Virat Kohlis instagram post : मी अशी ऊर्जा अनुभवली नव्‍हती

विराट कोहलीने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे, "२३ ऑक्‍टोबर २०२२ हा दिवस माझ्‍यासाठी नेहमी खास राहणार आहे. मी यापूर्वी कोणत्‍याही सामन्‍यात अशी ऊर्जा अनुभवली नव्‍हती. काय उर्जावान संध्‍याकाळ होती ती!" विराटच्‍या या पोस्‍टवर कमेंटचा पाऊस पडला आहे. या पोस्टला लाखो लाईक्‍स आणि कमेंटस मिळाल्‍या आहेत. काहींनी म्‍हटलं आहे की. खरंच २३ ऑक्‍टोबर २०२२ या दिवशी झालेला सामना अविस्मरणीय होता.

विराट खेळीमुळे टीम इंडियाने नोंदवला होता स्‍मरणीय विजय

टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेतील पहिला सामना भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यामध्‍ये झाला होता.   थम फलंदाजी करताना पाकिस्‍तानने भारतासमोर १५९ धावांचे आव्‍हान ठेवले होते. या आव्‍हानांचा सामना करताना भारताने ५० धावांमध्‍येच सलामीवीरांसह चार गडी गमावले होते. अशा अवस्‍थेत विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने भारताच्‍या विजयाचा पाया घातला. या सामन्‍यात पाकिस्‍तानचा वेगवान गोलंदाज हैरिस रउफ याला विराट कोहलीने दोन षटकार खेचत सामन्‍याचा निकालच बदलला होता. शेवटच्‍या चेंडूवर आर. अश्‍विनने चौकार लगावत आणि भारताने रोमहर्षक विजय नोंदवला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news