पुणे जिल्ह्यात 2 हजार 231 कोटींचे पीक कर्जवाटप पूर्ण

पुणे जिल्ह्यात 2 हजार 231 कोटींचे पीक कर्जवाटप पूर्ण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्याचे आर्थिक वर्ष 2023-24 मधील खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 3 हजार 254 कोटी आणि रब्बीचे 1 हजार 346 कोटी मिळून 4 हजार 600 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 15 जुलैअखेरच्या ताज्या अहवालानुसार खरीप हंगामात 2 हजार 231 कोटी 67 लाख रुपयांइतके म्हणजे 71.64 टक्क्यांइतके पीक कर्ज वाटप पूर्ण करण्यात बँकांना यश आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 35 हजार

405 शेतकर्‍यांना 775 कोटी 49 लाख रुपयांइतके पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी त्यांनी आज अखेर 16 हजार 142 शेतकर्‍यांना 322 कोटी 23 लाख रुपयांइतके पीक कर्जाचे वाटप पूर्ण केले आहे. दिलेल्या उद्दिष्टांच्या 41.55 टक्क्यांइतके पीक कर्जवाटप त्यांनी पूर्ण केले आहे.

खासगी बँकांना 20 हजार 191 शेतकर्‍यांना 430 कोटी 33 लाख रुपयांइतके पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी त्यांनी आजअखेर 4 हजार 883 शेतकर्‍यांना 181 कोटी 19 लाख रुपयांइतके म्हणजे उद्दिष्टांच्या 42.10 टक्क्यांइतके पीक कर्जवाटप पूर्ण केले आहे. याचा विचार करता सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील व्यापारी बँकांना मिळून 56 हजार 535 शेतकर्‍यांना 1 हजार 205 कोटी 82 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी त्यांनी 21 हजार 25 शेतकर्‍यांना 503 कोटी 42 लाख रुपये म्हणजे उद्दिष्टांच्या 41.75 टक्क्यांइतकेच पीक कर्जवाटप पूर्ण केले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेस 133 शेतकर्‍यांना 3 कोटी 53 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करायचे आहे. त्यांनी 249 शेतकर्‍यांना 3 कोटी 35 लाख रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या 94.90 टक्के वाटप पूर्ण केले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत 72 टक्के पीक कर्जवाटप पूर्ण झाले असून, सप्टेंबर महिनाअखेर 100 टक्के कर्जवाटप होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पीडीसीसी बँकेचा सर्वाधिक वाटा

पुणे जिल्ह्यातील एकूण पीक कर्जवाटप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (पीडीसीसी) मोठा वाटा आहे. जिल्हा बँकेस 2 लाख 57 हजार 655 शेतकर्‍यांना खरिपात सुमारे 2 हजार 45 कोटी 16 लाख रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा बँकेने 2 लाख 5 हजार 406 शेतकर्‍यांना 1 हजार 824 कोटी 90 लाख (89.23 टक्के) रुपयांइतके सर्वाधिक पीक कर्जवाटप करून आपले पीक कर्जवाटपातील स्थान अढळ ठेवले असल्याचेही कारेगावकर यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news