LPG cylinder price : सिलिंडर दरात मोठी घट, जाणून घ्या नवे दर

LPG cylinder price : सिलिंडर दरात मोठी घट, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : महागाईने हैराण झालेल्या लोकांना सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर (LPG cylinder price) दरात मोठी कपात केली आहे. इंडियन ऑइलने १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडर दरात १०० रुपयांची कपात केली आहे. सिलिंडरचे कमी झालेले दर आजपासून लागू होतील.

यामुळे दिल्लीत १९ किलो वजनाचा सिलिंडर १,९७६.५० रुपयांएेवजी १,८८५ रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये हा सिलिंडर १,९९५.५० रुपये, मुंबईत १,८४४ रुपये आणि चेन्नईत २,०४५ रुपयांना मिळणार आहे. दिल्लीत ९१.५० रुपये, कोलकातामध्ये १०० रुपये, मुंबईत ९२.५० रुपये आणि चेन्नईत ९६ रुपयांनी सिलिंडर स्वस्त झाला आहे.

दरम्यान, घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या सिलिंडर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर दिल्लीत १,०५३ रुपये आहे. गेल्या महिन्यात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. कोलकातामध्ये याची किंमत १,०७९ रुपये तर मुंबईत १,०५२.५० रुपये आणि चेन्नईत १,०६८.५० रुपये आहे.

१ जून रोजी १९ किलो वजनाच्या सिलिंडर दरात (LPG cylinder price) १३५ रुपयांची कपात झाली होती. तर १ जुलै रोजी तो १९८ रुपयांनी स्वस्त झाला होता. १ ऑगस्ट रोजी त्याचा दर ३६ रुपयांनी कमी केला होता. या आधी १ एप्रिल रोजी १९ किलो वजनाच्या सिलिंडर दरात मोठी वाढ करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news