गडचिरोली : नक्षलवादी आणि पोलिसांत मोठी चकमक; एक पोलिस जवान जखमी | पुढारी

गडचिरोली : नक्षलवादी आणि पोलिसांत मोठी चकमक; एक पोलिस जवान जखमी

गडचिरोली; पुढारी वृत्‍तसेवा : आज (मंगळवार) सकाळी भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरातील इरपणार-भटपार गावानजीकच्या जंगलात नक्षली आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक उडाली. या चकमकीत एक पोलिस जवान जखमी झाला. राकेश उपाध्याय असे जखमी जवानाचे नाव असून, त्याला नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज सकाळी पोलिस दलाच्या सी-६० पथकाचे जवान इरपणार-भटपार जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. यावेळी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, यात राकेश उपाध्याय हा जवान जखमी झाला. त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. परिसरात अजूनही नक्षल चकमक सुरुच असल्याची माहिती मिळत आहे.

Back to top button