माहिती अधिकार कार्यकर्ता आल्हाटसह 7 जणांवर गुन्हा | पुढारी

माहिती अधिकार कार्यकर्ता आल्हाटसह 7 जणांवर गुन्हा

पुणे: पुढारी वृत्तसेवा 
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याकडे वारंवार खोटे तक्रार अर्ज करून त्याद्वारे निलंबन करून पोलिस उपनिरीक्षकाला 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी 25 लाख रुपयांची खंडणी उकळणारा माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाट याच्यासह 7 जणांवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सुधीर आल्हाट (रा. रामांचल बिल्डिंग, शिवाजीनगर), अर्चना समुद्र, रोहन समुद्र, दिनेश समुद्र (तिघे रा. कोथरूड), जितू भाऊ, अण्णा जेऊर आणि मनीषा धारणे (रा. कोथरूड) अशी अन्य गुन्हा दाखल झालेल्यांची  नावे आहेत. यापूर्वी एका महिलेकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने सुधीर आल्हाट याला अटक केली होती. .
याबाबत पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष सोनवणे यांनी पोलिस महासंचालकांपासून पोलिस आयुक्तांपर्यंत सर्वांकडे 26 नोव्हेंबर 2021 रोजी तक्रार सादर करून न्यायाची मागणी केली आहे. मात्र, अजूनही त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा फेरविचार झाला नाही.
फिर्यादी यांच्याकडे दिनेश समुद्र आणि इतरांनी केलेल्या 12 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा तपासासाठी होता. ते दीर्घकाळ येरवडा कारागृहात होते. सुधीर आल्हाट याने वकील देऊन त्याला जामीन मिळवून दिला. समुद्र याच्या गुन्ह्यात मदत न केल्याने आल्हाट याने सोनवणे यांना धमकाविण्यास सुरुवात केली. त्याकडे त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. आल्हाट याने अतिवरिष्ठ पोलिस अधिकार्‍याकडे वारंवार खोट्या तक्रारी केल्याने सोनवणे यांना निलंबित करण्यात आले. 32 अधिकार्‍यांना निलंबित केले असल्याचे सांगून आल्हाट याने सोनवणेंना बडतर्फीची ऑर्डर लवकरच निघेल अशी धमकी दिली होती.
हेही वाचा :

मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्यांना बजावली कलम १४९ ची नोटीस

दिलेले आश्वासन पाळणाऱ्या नेत्यावरच जनतेचा विश्वास : नितीन गडकरी

Atal Pension : अटल निवृत्तीवेतन योजनेची ४ कोटींहून अधिक नोंदणी

Back to top button