ऑनलाईन ‘गेमिंग’ने धर्मांतर, आराेपीला १५ दिवसांची ‘ट्रान्झिट रिमांड’

ऑनलाईन ‘गेमिंग’ने धर्मांतर, आराेपीला १५ दिवसांची ‘ट्रान्झिट रिमांड’

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणातील मुख्य आराेपी शाहनवाज खान मकसूद ऊर्फ बद्दो याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने १५ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिला आहे.  मुंब्रा पोलिसांनी त्याला रविवारी अलिबागमधून अटक केली होती. अलिबाग येथील एका लॉज लॉजवर छापा टाकून पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. आज (दि.१२) ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांड  दिला असून त्याचा ताबा आता उत्तर प्रदेश पोलिसांकडे दिला जाणार आहे.

लॉजमध्ये लपला होता शाहनवाज

शाहनवाज हा मुंब्रा येथील रहिवाशी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गाझियाबाद पोलिस त्याचा शाेध घेत हाेते. रविवारी अलिबाग येथील एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आले. तो आपल्या भावासोबत तेथे लपून बसला होता. त्यानंतर सायंकाळी त्याला ठाण्यात आणण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यात शाहनवाजने धर्मांतर विषयी अल्पवयीन मुलांशी बोलत असल्याची कबुली दिली.

गाजियाबादमधील कवीनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीमधील पीडित अल्पवयीन मुलगा व शाहनवाज यांची ओळख जानेवारी २०२१ मध्ये फोर्ट नाईट या गेमिंग ॲप्लिकेशनवरून झाली होती. त्यानंतर गेम खेळणाऱ्या मुलांशी शाहनवाज हळूहळू ओळख वाढवून त्यांच्याशी बोलू लागला. त्यानंतर त्याने शंभरहून अधिक मुलांचे मोबाईल नंबर मिळवले हाेते.

विशिष्ट प्रार्थना करतो म्हणून जिंकतो

गेमिंग खेळणाऱ्या बऱ्याच मुलांशी ऑनलाईन ओळख झाल्यानंतर शाहनवाजने वलोरंट या गेमिंग ॲपवर त्याच्या संपर्कातील मुलांना जमवण्यास सुरुवात केली. या ॲपमध्ये गेम जिंकत गेल्यानंतर आयस बॉक्स नावाचा एक टप्पा येतो. हा टप्पा फक्त शाहनवाज पार करायचा व इतर मुले हरायची. यावेळी तो मुलांना मी एका विशिष्ट धर्माचीच प्रार्थना करीत असल्याने मी गेम जिंकतो, असे तो मुलांना पटवून द्यायचा.

शाहनवाजचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. या सीडीआरमधून शंभरहून अधिक अल्पवयीन मुलांचे नंबर समोर आले आहेत. तसेच शाहनवाजच्या वेगवेगळ्या 7 बँक खात्यांची देखील माहिती पोलिसांनी मिळवली आहे. शाहनवाजच्या खात्यात दर महिन्याला लाखो रुपये गुजरात, महाराष्ट्र, यूपी, दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड आदी ठिकाणांहून जमा करण्यात येत होते, असे देखील स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news