विरारमध्ये ICICI Bank लुटीचा थरार; महिला बँक मॅनेजरची हत्या | पुढारी

विरारमध्ये ICICI Bank लुटीचा थरार; महिला बँक मॅनेजरची हत्या

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : विरार ईस्ट परिसरात असलेल्या ICICI Bank लुटण्याचा प्रयत्न काही दोरेडेखोरांनी केला. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांना विरोध केल्याने ICICI Bank च्या महिला मॅनेजरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तर कॅशिअर महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांना नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेतील एका चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर दुसरा चोरटा फरार झाला आहे.

विरार पूर्वेकडे आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.

आरोपी हा पूर्वी याच शाखेत मॅनेजर होता व त्याच्यावर एक कोटींचे कर्ज होते.

ते फेडण्यासाठी हा डाव आखल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते.

त्याने येण्याच्या आधी या ठिकाणी असलेल्या महिला मॅनेजरला फोन करून विचारपूस केल्याचेही कळते.

संध्याकाळच्या वेळेला कमी कर्मचारी वर्ग असल्याने हा डाव आखला असल्याचे बोलले जात आहे.

त्याने पावणेआठच्या सुमारास शाखेत घुसून महिला मॅनेजर योगिता चौधरी, कॅशियर श्रद्धा देवरुखकर यांच्या गळ्यावर चाकू ठेवून लॉकरमधील सोने काढून चोरी करून पळण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी मॅनेजर चौधरी यांनी विरोध केल्यावर चाकूने त्यांची हत्या केली.

कॅशियर श्रद्धा देवरुखकर यांच्यावर हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहे.

एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Back to top button