National Cinema Day Movie Tickets : ‘या’दिवशी मिळणार केवळ ९९ रुपयांत चित्रपटाचे तिकिट, वाचा

National Cinema Day 2023
National Cinema Day 2023
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिने प्रेमींसाठी खुशखबरी असून नॅशनल सिनेमा डे (National Cinema Day Movie Tickets) ला पुन्हा एकदा कमी किंमतीत चित्रपटाची किमती खरेदी करता येणार आहेत. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (एमएआय-Multiplex Association of India) ने गुरुवारी घोषणा केलीय. या‍वर्षी १३ ऑक्टोबर रोजी नॅशनल सिनेमा डे साजरा केला जात आहे.  (National Cinema Day Movie Tickets)

MAI ने जाहीर केले आहे की, १३ ऑक्टोबर रोजी चित्रपट चाहत्यांना देशभरातील चित्रपटगृहांमध्ये केवळ ९९ रुपये देऊन चित्रपट पाहता येईल.

चित्रपट कुठे पाहू शकता?

MAI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, PVR, INOX, Cinepolls, Mirage, Delight यासह देशभरातील ४ हजारहून अधिक स्क्रीन्सवर पाहता येणार आहे. राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्ताने या कंपन्यांनी सहभाग दर्शवला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news