नागपूर; पुढारी वृत्तसेवा
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात कोरोना बाधितांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत शंभरी गाठली आहे. सोमवार (दि. ३ ) रोजी १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असतानाच नागपुरात १०५ कोरोना बाधितांची नोंद झाल्याने प्रशासनावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
याआधी रविवार (दि. २) रोजी ९० कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर मंगळवार (दि. २८ ) रोजी ४४ कोरोना पॉझिटिव्ह आणि शुक्रवार रोजी ८१ कोरोना बाधित आढळले होते.
सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या तीन आकडयावर गेली असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. २३ डिसेंबर २०२१ पर्यत एक आकडी असलेली कोरोना बाधिताची संख्या २४ डिसेंबर २०२१ पासून सातत्याने वाढत आहे. निर्बंध घातल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचलंत का?