सोलापूर : महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीवर मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व | पुढारी

सोलापूर : महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीवर मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व

श्रीपुर : पुढारी वृत्तसेवा

महाळूंग -श्रीपूर नगर पंचायत निवडणुकीत मोहिते पाटील गटाचे समर्थक भिमराव रेडे-पाटील यांच्या ५ तर नानासाहेब मुंडफणे यांच्या ४ जागा निवडून आल्या. १७ पैकी ९ जागा मिळवत मोहिते पाटील गटाने नगर पंचायतीवर वर्चस्व निर्माण केले आहे. तर राष्ट्रवादीचे राहुल रेडे यांनी कडवी झुंज देत ६ जागा निवडून आणल्या आहेत. तर भाजपला  प्रभाग क्रमांक ११ मध्ये  एक जागा जिंकता आली आहे, त्यामुळे भाजपची चांगलीच नामुष्की झाली आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एकमध्ये काँग्रेसचा एकच उमेदवार उभा केला होता. त्या महिला उमेदवार कल्पना विक्रांत काटे विजयी झाल्या आहेत.

मोहिते पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व

महाळुंग – श्रीपूर नगर पंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, मोहिते पाटील समर्थकांच्या दोन स्थानिक आघाड्या, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष हे पूर्ण ताकतीने उतरले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल रेडे पाटील यांनी चांगली झुंज देत ६ जागा निवडून आणल्या, तर  मोहिते पाटील गटाचे भिमराव रेडे पाटील यांनीही ५ जागा तर मोहिते पाटील गटाचेच नानासाहेब मुंडफणे यांनी ४ जागा जिंकल्या.  त्यामुळे दोन्ही गट मोहिते पाटील यांचे असल्याने महाळुंग श्रीपूर नगर पंचायतीवर मोहिते पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे. या निवडणुकीत भाजपने १७ जागेवर उमेदवार उभे केले होते, त्यांना फक्त प्रभाग क्रमांक ११ मधील एक जागा जिंकता आली. तर  शिवसेनेच्या सर्व उमदेवारांना डिपॉझिट वाचवता आले नाही. एकंदरीत या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या गटाचीच जादू चालल्याचे निकालानंतर दिसून आले.

हेही वाचलतं का?

Back to top button