Pakistan : कंगाल पाकला चीनकडून १ अब्ज डॉलर्स; आयएमएफच्या विलंबामुळे दिवाळखोरीचे संकट

Pakistan : कंगाल पाकला चीनकडून १ अब्ज डॉलर्स; आयएमएफच्या विलंबामुळे दिवाळखोरीचे संकट

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : तिजोरीत खडखडाट, आयएमएफकडून निधी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने दिवाळखोरीच्या दिशेने निघालेल्या कंगाल पाकिस्तानच्या झोळीत (Pakistan) अखेर चीनने 1 अब्ज डॉलर्सची मदत टाकली आहे. (Pakistan)

'एआरवाय न्यूज'ने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या हवाल्याने हे वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की, अतिशय महत्त्वाच्या वेळी पाकिस्तानला (Pakistan) चीनकडून 1 अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध झाला आहे.

तिजोरीत ठणठणाट असून कर्जाचे हप्तेही फेडण्यासाठी पाकिस्तानच्या (Pakistan) तिजोरीत पैसे नाहीत. यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सहा अब्ज डॉलर्सचे पॅकेज हवे आहे; पण आयएमएफने केलेल्या सूचनांचे पालन अर्थसंकल्पात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत निधी देण्याबाबत काहीशी नकारात्मक स्थिती असल्याचे सांगितले. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार म्हणाले की, चीनच्याच एका कर्जापोटी 1 अब्ज 30 कोटी डॉलर्स पाकिस्तानने भरले असून त्या कर्जाची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यातून सोमवारपर्यंत स्टेट बँकेत 1 अब्ज 30 कोटी डॉलर्स चीनकडून जमा होतील. याशिवाय आणखी 2 अब्ज डॉलर्स उधारीवर चीनकडून घेण्याबाबत दोन देशांत बोलणी सुरू आहेत.

दार यांनी आयएमएफ पाकिस्तानबाबत (Pakistan) विनाकारण ताठर भूमिका घेत असल्याबाबत नाराजी व्यक्त करीत अनेक बैठका होऊनही आयएमएफचे अधिकारी पाकिस्तानच्या पॅकेजच्या प्रस्तावावर निर्णय घ्यायला तयार नाहीत, असेही म्हटले आहे.

पाकिस्तानात या आणि चौथ्यांदा पंतप्रधान व्हा शाहबाज शरीफ यांचे बंधू नवाज शरीफ यांना साकडे

पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात अपयशी पंतप्रधान असा शिक्का बसलेले पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आता आपल्याला व देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी थोरले बंधू व माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनाच साकडे घातले आहे. नवाजभाई, पाकिस्तानात परत या आणि चौथ्यांदा पंतप्रधान व्हा, अशी विनवणीच त्यांनी केली आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी हे आर्जव केल्याचे वृत्त आहे. ते म्हणाले की, आपला पक्ष बडे भाई नवाज शरीफ यांची चातकासारखी वाट पाहत आहे. त्यांनी पाकिस्तानात यावे, पक्षाची धुरा सांभाळावी. नोव्हेंबरच्या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करावे आणि चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे.

नोव्हेंबर 2019 पासून नवाज शरीफ स्वयंघोषित राजकीय सन्यास घेऊन लंडनमध्ये राहत आहेत. त्यासाठी त्यांनी तब्येतीचे कारण सांगितले असले, तरी त्यांच्या विरोधात लष्कर आक्रमक झाल्याने त्यांनी देश सोडला, असे बोलले जाते. नवाज शरीफ यांना पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवत पक्षाचे पद सांभाळण्यासही बंदी घातल्यानंतर सारी सूत्रे त्यांचे धाकटे बंधू व विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news