Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीचे घेतले दर्शन; राजकीय चर्चांना उधाण | पुढारी

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीचे घेतले दर्शन; राजकीय चर्चांना उधाण

छत्रपती संभजाीनगर, पुढारी वृत्तसेवा : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शनिवारी (दि.१७) दुपारी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे सपत्नीक दर्शन घेतले. प्रकाश आंबेडकर यांनी अचानक येऊन कबरीचे दर्शन घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आले असून याबाबत तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. यानंतर सायंकाळी ६.३० च्या सुमारास भद्रा मारूतीचेही दर्शन घेतले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शनिवारी अचानक दौलताबाद येथील औरंगजेबाच्या समाधीला सपत्निक भेट दिली. ते दौलताबाद येथे कार्यकर्ता शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी येथे आले होते. कार्यकर्ता शिबिर पार पडल्यानंतर त्यांनी थेट औरंगजेबाची कबर गाठल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी खुलताबाद येथे जाऊन भद्रा मारूतीचेही दर्शन घेतले. त्यांनी औरंगजेबाच्या समाधीला का भेट दिली या बाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

औरंगजेबाची ओळख मिटवणार का ? (Prakash Ambedkar)

दरम्यान कबरीला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतांना औरंगजेबांनी ५० वर्षे राज्य केले. ते तुम्ही कसे मिटवणार, औरंगजेब का आला, औरंगाजेबाचं राज्य का आलं, हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. जयचंद इथे आले आणि राज्या-राज्यात झाले. त्यामुळे जयचंदांना शिव्या घाला. त्या जयचंदाला शिव्या देण्याऐवजी औरंगजेबाला का शिव्या घालता असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला. तुघलकापासून दौलताबादला राजधानीचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू होत्या. आता यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यावा असेही यावेळी ते म्हणाले.

राज्यातील जनता जागृत

राज्यात अनेक संघटना दंगली घडवून आणणार असल्याचा अहवाल नागपूर येथील एसआयटीने दिला होता. असे असतांनाही १२ ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्यातील जनतेने याला दाद दिली नाही. काही लोक विभाजनाचा प्रयत्न करत होते. हा प्रयत्न जनतेनेच हाणून पाडला, आता राज्यातील जनता जागृत झाली असल्याचेही मत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

आम्हीही धडा शिकवू

औरंगजेबाचे उद्दातीकरण करणाऱ्यांना धडा शिकवू असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला उत्तर देतांना जयचंदांनी देशाला गुलामीत ठेवले अशांना आता आम्हीच धडा शिकवू, असे रोख ठोक मत यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा :

Back to top button