

पुणे, पुढारी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे 2016 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील फाशीची शिक्षा झालेल्या मुख्य आरोपीने पुण्यातील येरवडा कारागृहात आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे असे मुख्य आरोपीचं नाव आहे. कारागृहातील पोलीस रात्री घस्त घालत असताना यांना हा प्रकार निदर्शनास आला.
कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यात एकाच खळबळ उडाली होती. यापाराकरणी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याच्यासह दोन साथीदारांना अटक करून न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोटावली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी (पपू शिंदे) याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पुण्यातील येरवडा कारागृहात आणण्यात आलं होत. दरम्यान त्यानं हे टोकाचं पाऊल नैराश्यातून केल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालूक्यातील कोपर्डी गावामध्ये 13 जुलै 2016 रोजी शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. राज्यात सर्वत्र मुख मोर्चे निघाले होते. तसेच ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपीना फाशीची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुण्यातील येरवडा कारागृहात रवाणा करण्यात आलं होत.
हेही वाचा