सोलापुरातील दोन डेअरींवर छापे | पुढारी

सोलापुरातील दोन डेअरींवर छापे

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा :  दुधात असलेली भेसळ तपासणीसाठी कार्यरत असलेल्या जिल्हास्तरीय पथकाने आज सोलापूर शहरातील दोन डेअरींवर छापे टाकले. त्याठिकाणहून दुधाचे दोन तर पनीर, लोणी व तुपाचा प्रत्येकी एक नमुना तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे.
जिल्हास्तरीय पथकाने बेडर पुलावरील मुकेश दुग्धालय याठिकाणी छापा टाकला.

त्याठिकाणहून गायीच्या दुधाचा एक व पनीरचा एक नमुना अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. ते नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याशिवाय त्याठिकाणचे वजनकाटेही तपासण्यात आले. त्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही. याशिवाय शुक्रवार पेठेतील पुकाळे डेअरीवरही आज छापा टाकण्यात आला. याठिकाणी गायीच्या दुधाचा, पनीर व लोण्याचा प्रत्येकी एक नमुना तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे.

याठिकाणीही वजनकाट्यांची तपासणी केली असता ते योग्य असल्याचे आढळले आहे. शहरात छापे टाकून तपासणीसाठी घेतलेले नमुने अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी पाठविले आहेत. शहरातून एकूण दोन डेअरींवर छापे टाकून पाच नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. ही कारवाई जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी नीलाक्षी जगताप यांच्या पथकातील सुरेश सरडे, अन्न व औषध प्रशासनाच्या प्रज्ञा सुरसे यांच्या पथकाने केली.

Back to top button